हजारो किलोमीटर दूर अंतरावरच युद्ध, पण बिअर, कंडोमसह भारतात अजून कुठल्या-कुठल्या क्षेत्रांना बसणार फटका?

भारतापासून हजारो किलोमीटर दूर इराण-अमेरिका यांच्यात युद्ध सुरू असलं तरी त्याचे पडसाद जगभरात उमटत आहेत. भारतातील विविध क्षेत्रांना या युद्धाचा फटका बसत आहे. हे कोणकोणते क्षेत्र आहेत, ते जाणून घ्या..

हजारो किलोमीटर दूर अंतरावरच युद्ध, पण बिअर, कंडोमसह भारतात अजून कुठल्या-कुठल्या क्षेत्रांना बसणार फटका?
AI Generated image
Image Credit source: ChatGPT
| Updated on: Apr 06, 2026 | 7:46 AM

इराण-अमेरिका यांच्यातील संघर्षाचे पडसाद संपूर्ण मध्यपूर्वेत उमटत असले तरी भारतातील बाजारपेठा, कारखाने आणि सर्वसामान्यांच्या घरापर्यंतही युद्धाच्या झळा पोहोचत आहेत. हे केवळ युद्ध नाही तर कच्चे तेल, गॅससह इतर अनेक वस्तूंच्या पुरवठा साखळीला बसलेला मोठा तडाखा आहे, ज्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे. तेल आणि गॅसच्या पुरवठ्यातील व्यत्ययांमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. रस्त्यावरील डांबरापासून, बिअर, पॅकेजिंग ते अगदी कंडोमपर्यंत अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे. हे युद्ध आणखी किती काळ चालेल, याचं उत्तर अद्याप अस्पष्टच आहे. परंतु यामुळे कोणकोणत्या गोष्टींवर कसा परिणाम झाला आहे किंवा होत आहे, याबद्दल जाणून घेऊयात.. बांधकाम आणि रिअल इस्टेटवर परिणाम इराण-अमेरिकेतील तणावाचा परिणाम प्रामुख्याने ऊर्जेच्या खर्चावर झाला आहे, ज्याचा थेट परिणाम बांधकाम क्षेत्रावर होत आहे. एलएनजी आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे सिमेंट, स्टील आणि टाइल्स कारखान्यांचा खर्च वाढला आहे. गुजरातमधील मोरबीसारख्या औद्योगिक क्लस्टर्समधील सिरॅमिक युनिट्सचा वेग मंदावला आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांसाठी प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. परिणामी अनेक...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us