Sanjay Raut Uncut PC | महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा; संजय राऊतांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरही निशाणा साधला.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरही निशाणा साधला.
“आसाम आणि पश्चिम बंगाल निवडणुकांनंतर जनतेवर महागाईचा बोजा टाकून पंतप्रधान परदेश दौऱ्यावर गेले आहेत. मोदींनी देशवासियांना आता गरीब व्हायला तयार राहा, असा संदेश दिला आहे,” असा आरोप राऊत यांनी केला. अदानींवरील अमेरिकेतील प्रकरणांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत, “अदानींना जागतिक स्तरावर न्याय मिळतो, पण शिवसेनेला सुप्रीम कोर्टातही न्याय मिळत नाही,” असे म्हटले.
महागाईमुळे देशात आर्थिक अराजक निर्माण होण्याची भीती व्यक्त करत राऊत म्हणाले, “पूर्वी महागाईविरोधात रस्त्यावर आंदोलने व्हायची. मात्र आता अशा आंदोलनांना देशद्रोह ठरवलं जातं.” पेट्रोल-डिझेल दरवाढीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी “जय श्रीराम म्हणत गप्प बसा,” असा टोला लगावला.
तसेच, “भाजप जमिनीवरचा पक्ष नाही. फेर निवडणुका घेतल्या तर जनतेचा कौल स्पष्ट दिसेल,” असंही राऊत यांनी म्हटलं.
Published on: May 19, 2026 11:47 AM
नाशिकमध्ये महायुतीचा मोठा पेच! गीते बंधूंनी वाढवलं टेन्शन
मोठी खळबळ! अभिजीत दिपकेला एअरपोर्टवरच.. वकिल असीम सरोदेंचा खळबळजनक...
आगीचा भडका अन् किंकाळ्यांचा थरार! राजधानीत 10 जणांचा दुर्दैवी अंत
हैराण करणारी बातमी! ऐकीकडे द्विपक्षीय व्यापाराची चर्चा अन्... अमेरिका

