AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा हाहाकार! रशियाकडून थेट चीनच्या जहाजावर मोठा हल्ला, जगात खळबळ, भारताने..

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली. थेट चीनच्या जहाजावर हल्ला झाला. धक्कादायक बाब म्हणजे हा हल्ला इराण किंवा अमेरिका या देशांनी केला नाही. चीनचा मित्र असलेल्या देशानेच हा मोठा हल्ला केला.

मोठा हाहाकार! रशियाकडून थेट चीनच्या जहाजावर मोठा हल्ला, जगात खळबळ, भारताने..
Chinese ship attack Russia
| Updated on: May 19, 2026 | 11:47 AM
Share

जगात खळबळ उडवणारी माहिती पुढे येत आहे. रशियाने थेट जिगरी मित्र चीनच्या जहाजावर हल्ला केला. या हल्ल्याने जग हैराण झाले. यामधील धक्कादायक बाब म्हणजे रशियाचे अध्यक्ष पुतिन लवकरच चीन दाैऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या चीन दाैऱ्यापूर्वीच हा हल्ला झाल्याने चर्चेला उधाण आले. युक्रेने दावा केला की, रशियाने त्याचा मित्र चीनच्या जहाजावर हल्ला केला. अल जझीराच्या वृत्तानुसार, युक्रेनने रशियावर गंभीर आरोप करत म्हटले की, काळ्या समुद्रात रशियन ड्रोनने चीनच्या जहाजाला टार्गेट करत हल्ला केला. युक्रेनच्या या दाव्याने सर्वांना मोठा धक्का बसला. एकीकडे इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. होर्मुज खाडीत जहाजांवर मोठे हल्ले केले जात आहेत. थेट काही जहाज बुडवण्यात देखील आली. होर्मुज खाडीत चीनच्या जहाजावर मोठा हल्ला झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा चीनच्या जहाजावर हल्ला करण्यात आला.

हा हल्ला रशियाकडून करण्यात आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. युक्रेनने रशियाकडून भूभाग परत मिळवला आणि त्याच्या काही भागांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले. युक्रेनियन बंदर प्राधिकरणाच्या माहितीनुसार, हल्ल्यांमध्ये दोन नागरी जहाजांना रशियाकडून टार्गेट करत हल्ला करण्यात आला. त्यापैकी एक मार्शल बेटाचे ध्वज असलेले जहाज होते तर दुसरे गिनी बिसाऊच्या ध्वजाखाली जहाज होते.

दोन्ही जहाजे ओडेसा भागातील बंदरांकडे जात होती. यादरम्यानच या जहाजावर हल्ला झाला. युक्रेनियन नौदलाने म्हटले की, चिनी मालकीचे केएसएल देयांग या मालवाहू जहाजावर हल्ला करण्यात आला. या जहाजावर चिनी कर्मचारी होते आणि ते मार्शल बेटांच्या ध्वजाखाली कार्यरत होते. युक्रेनियन नौदलाने जहाजाचा एक फोटोही शेअर केला. त्यात जहाजाचे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

ओडेसा हे युक्रेनसाठी एक महत्त्वाचे सागरी केंद्र आहे. तिथे मोठ्या प्रमाणात रशियाकडून हल्ला केला जात आहे. मात्र, रशियाकडून चीनच्या जहाजावर हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली. आता युक्रेनकडून हीच गोष्टी मोठी केली जात असून तिला रंगवले जात आहे. यावर अजूनही चीनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...