“कोरोनाचं उगमस्थान चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळाच”, WHO प्रमुखांचा दुजोरा

| Updated on: Jun 20, 2022 | 8:33 AM

कोरोनाचा उगम चीनमध्येच झाला असल्याच्या दाव्याला आता WHO नेही दुजोरा दिला आहे. WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी खासगीत बोलताना ही बाब मान्य केली आहे.

कोरोनाचं उगमस्थान चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळाच, WHO प्रमुखांचा दुजोरा
कोरोना
Image Credit source: pixabay.com
Follow us on

मुंबई : कोरोनाने (Corona) जगभरात हाहा:कार माजवला. अनेकांचे प्राण गमवावे वागले. हा कोरोना विषाणू नेमका आला कुठून? याचा शोध अद्याप लागलेला नाही. पण त्याचं मूळ चीनच्या वुहान शहारातील विषाणू प्रयोगशाळा असल्याचा दावा आतापर्यंत अनेकदा केला गेला आहे. पण या दाव्याला जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) ने दुजोरा दिला आहे. WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी खासगीत बोलताना ही बाब मान्य केली आहे. या प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा प्रसार झाला. कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला, असं डॉ. टेड्रॉस (DR. Tedros) यांनी म्हटलं आहे.

“कोरोनाचा उगम चीनमध्येच”

कोरोनाचा उगम चीनमध्येच झाला असल्याच्या दाव्याला आता WHO नेही दुजोरा दिला आहे. WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी खासगीत बोलताना ही बाब मान्य केली आहे. “कोरोनाने अनेकांचे जीव घेतले. चीनच्या वुहान शहरातील प्रयोगशाळाच कोरोनाचं उगमस्थान आहे. तिथूनच कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला”, असं डॉ. टेड्रॉस यांनी म्हटलं आहे.

‘डेली मेल’ने याविषयी वृत्त दिलं आहे. टेड्रॉस यांनी एका युरोपच्या नेत्याला याविषयीची माहिती दिली आहे. कोरोनाचा प्रसार चीनच्या प्रयोगशाळेतूनच झाला आहे, असं त्यांनी म्हटलंय. आतापर्यंत कोरोनामुळे 1.8 कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता डॉ. टेड्रॉस यांनी ही बाब मान्य केली आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात काल दिवसभरात 4 हजार 4 रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात 23,746 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर 3 हजार 85 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत 77 लाख 64 हजार 117 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर मुंबईत काल दिवसभरात 2 हजार 87 रुग्ण रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे.