Lassa Fever : जगावर नवं संकट, आफ्रिकेत ‘लस्सा’ तापानं दीडशेपेक्षा जास्त मृत्यू, पावसाळ्यात उंदरांपासून सावधान

Lassa Fever : जगावर नवं संकट, आफ्रिकेत 'लस्सा' तापानं दीडशेपेक्षा जास्त मृत्यू, पावसाळ्यात उंदरांपासून सावधान

नायजेरियामध्ये या वर्षी लासा तापाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 155 वर पोहोचली आहे. संसर्ग कमी करण्यासाठी सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jun 19, 2022 | 7:13 PM

मुंबई : कोरोनामुळे जग त्रस्त असतानाच आता एका नव्या आजाराने डोकं वर काढलंय. आफ्रिकेत (Africa) तापाचा नवा प्रकार समोर आला आहे. ‘लस्सा’ हा नवा ताप आलाय. नायजेरियामध्ये या वर्षी लासा तापाने (Lassa fever) मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 155 वर पोहोचली आहे. संसर्ग कमी करण्यासाठी सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून 4,939 लोकांना लस्सा ताप असल्याचा संशय होता. 782 लोकांना हा आजार झाला असल्याचं उघडकीस आलं. जूनच्या सुरुवातीपर्यंत 155 मृत्यूंची नोंद झाली, असं नायजेरिया सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने (NCDC) सांगितलं. नायजेरियातील मृत्यूचे प्रमाण 19.8 टक्के आहे, जे 2021 मध्ये याच कालावधीत नोंदवलेल्या 20.2 टक्क्यांपेक्षा कमी आहे. यातील 24 राज्यांमध्ये किमान एका रुग्णाची नोंद झाली आहे. देशातील या आजाराचं प्रमाण 68 टक्के आहे, असं एनसीडीसीने सांगितलं.

आफ्रिकेत ‘लस्सा’ तापाचा कहर

नायजेरियामध्ये या वर्षी लासा तापाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 155 वर पोहोचली आहे. संसर्ग कमी करण्यासाठी सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून 4,939 लोकांना लस्सा ताप असल्याचा संशय होता. 782 लोकांना हा आजार झाला असल्याचं उघडकीस आलं.

लक्षणं काय?

लस्सा तापाची लक्षणे मलेरियासारखीच आहेत. या विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर एक ते तीन आठवड्यांच्या दरम्यान दिसू लागतात. ताप, थकवा, अशक्तपणा आणि डोकेदुखी ही या आजाराची लक्षणं आहेत, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

लासा ताप हा विषाणूंच्या एरेनाव्हायरस कुटुंबातील लासा विषाणूमुळे होतो. हा विषाणूजन्य रक्तस्रावी आजार आहे. लस्सा विषाणूची लागण मानवाला सामान्यतः लघवीच्या माध्यमातून, दूषित अन्न , घरगुती वस्तूंच्या संपर्कात आल्याने किंवा संक्रमित मास्टोमीस उंदरांच्या विष्ठेमुळे होतो. हा रोग पश्चिम आफ्रिकेच्या काही भागांमध्ये उंदीरांमध्ये आढळला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें