इस्त्रायलनं कोरोनाची जीवघेणी लाट कशी परतवली? वाचा सविस्तर

सध्याच्या घडीला इस्रायलमध्ये कोणतेही निर्बंध नसून लोकांना मास्कविना फिरण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. | Israel lifts covid 19 restrictions

इस्त्रायलनं कोरोनाची जीवघेणी लाट कशी परतवली? वाचा सविस्तर
Rohit Dhamnaskar

|

Apr 19, 2021 | 2:40 PM

जेरुसलेम: सध्या भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहाचला असून दररोज रुग्णसंख्येचे नवनवे उच्चांक रचले जात आहेत. जगातील अनेक देशांची परिस्थिती याहून वेगळी नाही. मात्र, या सगळ्यात इस्रायल (Israel) हा देश मात्र अपवाद ठरताना दिसत आहे. (Israel lifts covid 19 restrictions)

आतापर्यंत जगभरात प्रगत तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या इस्रायलने कोरोनाचा पूर्णपणे पराभव केला आहे. सध्याच्या घडीला इस्रायलमध्ये कोणतेही निर्बंध नसून लोकांना मास्कविना फिरण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. फक्त एखाद्या खोलीत किंवा बंदिस्त जागेत जास्त गर्दी असल्यास तोंडावर मास्क लावण्याची सक्ती आहे.

तसेच देशातील सर्व शिक्षणसंस्थाही सुरु करण्यात आल्या आहेत. अगदी प्राथमिक शाळाही सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला इस्रायलमधील तब्बल 60 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात इस्रायलमध्ये कोरोनामुळे फार मोठा प्रभाव पडणार नसल्याचा दावा केला जात आहे.

इस्रायलने हे कसं करून दाखवलं?

इस्रायलने अत्यंत वेगाने लसीकरण करून तब्बल 60 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. आतापर्यंत इस्रायलमधील 93 लाख लोकांना फायझरची लस टोचण्यात आली आहे. ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचे सांगितले जाते.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात इस्रायलमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर देशातील कोरोनाच्या मृत्यूदरात घट झाली. त्यामुळे आता इस्रायलमधील दैनंदिन व्यवहार पुन्हा सुरु केले जात आहेत. मे महिन्यापासून इस्रायलमध्ये परदेशी नागरिकांनाही प्रवेश देण्यात येईल. जगात कोरोनाची साथ आल्यापासून इस्रायलमध्ये आतापर्यंत 8.36 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. देशातील एकूण 6,331 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या:

निवडणुकांमुळे कोरोना वाढला असता तर महाराष्ट्रात 60 हजार आणि बंगालमध्ये 4 हजारच रुग्ण का; अमित शाहांचा प्रतिसवाल

Fact Check | संपूर्ण देशात लॉकडाऊन लागणार का, खुद्द अमित शाह म्हणाले….

लसीकरणाचा वेग वाढवा; मनमोहन सिंगांचे मोदी सरकारला 5 सल्ले

(Israel lifts covid 19 restrictions)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें