प्रसुतीकळा सुरु झाल्या अन् ती सायकलवर स्वार झाली, महिला खासदाराच्या डिलीव्हरीची जगभर चर्चा

| Updated on: Nov 29, 2021 | 10:12 AM

ऐकावे ते नवलच...म्हटंल्याप्रमाणे न्यूझीलंडमधील एका महिला खासदाराने प्रसुतीच्या कळा सहन करत सायकल चालवत दवाखाना गाठला आणि बाळाला सुखरूप जन्म दिला. दवाखाण्यात पोहचल्यानंतर एक तासांनी त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला.

प्रसुतीकळा सुरु झाल्या अन् ती सायकलवर स्वार झाली, महिला खासदाराच्या डिलीव्हरीची जगभर चर्चा
महिला खासदाराची डिलीव्हरी
Follow us on

मुंबई : ऐकावे ते नवलच…म्हटंल्याप्रमाणे न्यूझीलंडमधील एका महिला खासदाराने प्रसुतीच्या कळा सहन करत सायकल चालवत दवाखाना गाठला आणि बाळाला सुखरूप जन्म दिला. दवाखान्यात पोहचल्यानंतर एक तासांनी त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. आपण पाहतो की, प्रसुतीच्या कळा सुरू झाल्यानंतर महिलांना काहीच सुधरत नाही, त्यांना ॲम्बुलन्सच्या मदतीने दवाखान्यात घेऊन जावे लागते. मात्र, याला न्यूझीलंडमधील खासदार ज्युली ऐनी जेंटर अपवाद ठरल्या आहेत.

विशेष म्हणजे या महिला खासदाराने हे पहिल्यांदाच केले नसून याअगोदर देखील 2018 मध्ये ज्युली ऐनीने पहिल्या डिलीव्हरीच्या वेळी देखील दवाखान्यामध्ये जाण्यासाठी सायकलाचा वापर केला होता. ज्युली ऐनी यांनी डिलीव्हरीनंतरचे बाळासोबतचे काही फोटो शेअर करत ही माहीती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी दवाखान्यातील सर्व स्टाफचे आभार देखील मानले आहेत.

ज्युली ऐनी या अमेरिका आणि न्यूझीलंड अशा दोन्ही देशांच्या नागरिक असून त्यांचा जन्म अमेरिकेमध्ये झाला आहे. त्या 2006 पासून न्यूझीलंडमध्ये स्थायिक आहेत. ज्युली यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, मोठी बातमी….आज सकाळी 3 वाजता आम्ही आमच्या कुटुंबातील नव्या सदस्याचे स्वागत केले आहे. विशेष म्हणजे ज्युली यांनी या पोस्टमध्ये म्हटंले आहे की, प्रसुतीच्या कळा सहन करत सायकलवर दवाखान्यात जायचे याबद्दल आम्ही कुठलाही प्लॅन केलेला नव्हता, पण ते घडले.

न्यूझीलंडमध्ये अशाप्रकारची घटना पहिल्यांदाच घडलेली नसून या अगोदर देखील पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न प्रसूती रजा घेतली होती. विशेष म्हणजे जॅसिंडा आर्डर्न यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीला आपल्या बाळाला सोबत आणले होते. त्यावेळी जगभरात जॅसिंडा आर्डर्न यांची चर्चा झाली होती. आता ज्युली ऐनी जेंटर यांनी चक्क प्रसुतीच्या कळा सहन करत सायकलवरून दवाखाना गाठल्याने मोठी चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या : 

पाकिस्तानात यात्रेला गेलेल्या विवाहित भारतीय महिलेने केलं लाहोरच्या पुरुषाशी लग्न!

Omicron : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगभर उलथापालथ, कोणत्या देशात काय नवे नियम? वाचा सविस्तर