Pakistan America : अमेरिकेचा इराणवर हल्ला, पण इज्जत निघाली पाकिस्तानची, चांगलेच तोंडावर आपटले
Pakistan America : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे जिहादी विचारांचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना लंचला बोलावल्यामुळे पाकिस्तानी भरपूर आनंदात होते. या आनंदाच्या भरात त्यांनी एक मोठी चूक केली. त्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानी डिप्लोमसीची लक्तर निघाली आहेत. अमेरिकेने इराणवर हल्ला केला. पण यात इज्जत गेलीय ती पाकिस्तानची.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या आठवड्यात पाकिस्तानचे जिहादी विचारांचे लष्करप्रमुख जनर असीम मुनीर यांना लंचसाठी बोलावलं होतं. अमेरिकेहून निमंत्रण आल्यापासून पाकिस्तानात अनेकांना आकाश ठेंगणं वाटू लागलं होतं. पाकिस्तानला हा आपला डिप्लोमॅटिक विजय वाटू लागला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी असीम मुनीर यांना का बोलावलं होतं? ते लवकरच स्पष्ट होईल. अमेरिकेने इराणवर जो हल्ला केला, त्या संदर्भात ही भेट होती असा एक मतप्रवाह आहे, दुसऱ्याबाजूला ट्रम्प कुटुंबाच्या क्रिप्टो बिझनेस संदर्भात चर्चेसाठी बोलावलं होतं, अशी चर्चा आहे. नेमकं का बोलावलेल? ते अजून स्पष्ट नाहीय. पण या छोट्याशा आनंदात पाकिस्तानने एक मोठी चूक केली. पाकिस्तानने फक्त तोंडावरच आपटला नाही, तर त्यांनी स्वत:च्या हाताने स्वत:च्या तोंडात मारुन घेतली असं म्हणावं लागेल.
जनरल असीम मुनीर यांच्यासोबत लंच झाल्यानंतर पाकिस्तानने 2026 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा प्रस्ताव दिला. पाकिस्तानच्या या प्रस्तावाला 24 तास पूर्ण होत नाहीत, तोच अमेरिकेने इराणवर हल्ला केला. अमेरिकेने इराणच्या तीन अणवस्त्र प्रकल्पांवर बॉम्ब वर्षाव केला. ते सुद्धा काही हजार किलोचे बॉम्ब टाकले. म्हणजे पाकिस्तानने ज्या व्यक्तीला नोबेल शांतता पुरस्कारासाठी प्रस्तावित केलं, त्याच्याच आदेशाने एक भीषण हल्ला झाला. पाकिस्तानने जो उतावळेपणा दाखवला, त्यांच्या डिप्लोमसीसाठी ही चपराक आहे.
अशी झाली पाकिस्तानी डिप्लोमसीची अवस्था
एकदिवसआधी पाकिस्तानने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 2026 सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा, यासाठी प्रस्ताव दिला. दुसऱ्यादिवशी इराणवर झालेल्या हल्ल्यामुळे शहबाज शरीफ सरकारला अमेरिकेवर टीका करावी लागली. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय नियमांच उल्लंघन केलय असं शरीफ सरकारने म्हटलं. दोन दिवसात दोन वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका पाकिस्तानने घेतल्या. “डिप्लोमॅटिक विसंगतीची ही खूप वाईट स्थिती आहे. एखाद्या माणसाच एक दिवस तुम्ही शांततेसाठी कौतुक करता आणि दुसऱ्यादिवशी तोच माणसू बॉम्बिंगचे आदेश देतो, तेव्हा तुम्ही शांत राहता” असं माजी राजदूत मलीहा लोधी म्हणाल्या.
