Ceasefire : पाकड्यांनी सरड्यासारखा रंग बदलाच, बाता शांततेच्या, मनात विखार, यापूर्वी कितीदा पाठीत खंजीर खुपसला?

India Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान युद्ध विराम झाला. पण ज्या देशाची निर्मितीच द्वेष, धर्मवेडेपण आणि लाखो निष्पाप लोकांच्या मृतदेहावर करण्यात आली, त्याकडून मानवतेची अपेक्षा ठेवणे आत्मघातच आहे. पुन्हा पाकड्यांनी त्यांचा सरड्याचा रंग दाखवलाच

Ceasefire : पाकड्यांनी सरड्यासारखा रंग बदलाच, बाता शांततेच्या, मनात विखार, यापूर्वी कितीदा पाठीत खंजीर खुपसला?
पाकिस्ताने पुन्हा दिला धोका
Image Credit source: गुगल
| Updated on: May 11, 2025 | 9:38 AM

Pakistan backstabbed India : चार दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे भारताने पाकिस्तानची चांगलीच दमकोंडी केली. पाकच्या मंत्र्यांनी अमेरिकेकडे मध्यस्थीची भीक मागितल्यानंतर दोन्ही देशात युद्ध विराम झाला. पण पाकड्यांनी अवघ्या तीन तासातच युद्धविरामाचे उल्लंघन केले. सीमारेषेवर गोळीबार केला. पाकडे हे धोकेबाज (Deceitful Pakistan) असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. यापूर्वी सुद्धा त्यांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि त्यांच्या लष्करावर विसंबून राहता येणार नाही, असा सूर देशभरात दिसून येत आहे. यापूर्वी सुद्धा पाकिस्तानने भारताला धोका दिला आहे. दहशतवाद्यांचा आका असलेला पाकिस्तान खरंच विश्वास ठेवण्या लायक आहे का? याची चर्चा होत आहे.

कारगिल युद्ध

फेब्रुवारी 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिल्ली-लाहौर बस सेवा सुरू केली आणि पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यांनी तत्कालीन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या सोबत सहमती करारावर स्वाक्षरी केली. पण अवघ्या काही महिन्यातच कारगिलच्या उंच डोंगररांगावर पाकिस्तानने घुसखोरी केली. 3 मे 1999 रोजी कारगिल युद्धात भारतीय सेनेने ऑपरेशन विजय अंतर्गत पाकड्यांना सळो की पळो असे केले होते.

संसदेवर हल्ला

जुलै 2001 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती परवेज मुशर्रफ हे भारतात आले होते. त्यांनी शांततेची चर्चा केली. त्यावेळी दोन्ही देशात मोठे करार झाले नाहीत. पण वातावरण सकारात्मक होते. मुशर्रफ यांनी त्यांच्या वाडवडिलांच्या भारतातील आठवणी जागवल्या. गोड गोडा थापा मारल्या आणि अवघ्या सहा महिन्यात भारतीय संसदेवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात 8 लोकांचा जीव गेला.

आता ही पाकड्यांनी त्यांचा मूळ रंग दाखवलाच. पाकिस्तानचे राजकारणी आणि लष्करी अधिकारी आणि दहशतवादी यांचा रंग, धर्म, भाषा, जात ही एकच म्हणजे भारताविरोधी आहे. पाकिस्तानची निर्मितीच मुळात भारताविरोधातील आहे. त्यामुळे काल युद्धविराम होताच काही तासात पाकिस्तानने युद्धविरामाचे उल्लंघन केले. सीमा रेषेवर गोळीबार केला. त्यात भारतीय नागरिक ठार झाले तर काही जण जखमी झाले.