पाकिस्तानला दणका, थेट अमेरिकेने दाखवला बाहेरचा रस्ता, रडण्याची वेळ..
पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून सतत इराण आणि अमेरिका युद्धात मध्यस्थी करताना दिसला. मात्र, पाकिस्तान आता तोंडावर पडला आहे. पाकिस्तानला अमेरिकेने दणका दिसला. चारही बाजूंनी पाकिस्तान घेरला गेलाय.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामध्येच अनेक देशांनी या युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणालाही हे युद्ध थांबवण्यात यश मिळाले नाही. अजूनही तणाव कायम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नजरेत चांगले होण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ पुढे पुढे करताना दिसले. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. पाकिस्तानने ज्याचा साधा विचारली केला नाही असा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला धक्का देत थेट मध्यस्थीच्या यादीतून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. अमेरिकेचे पाय चाटताना पाकिस्तान दिसला. मात्र, तरीही पाकिस्तानला आपली जागा अमेरिकेने दाखवली. इराण आणि अमेरिका यांच्यातील मध्यस्थीतून त्यांची सुट्टी केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नव्या पोस्टमध्ये म्हटले की, त्यांनी इराणसोबतच्या युद्धात चर्चेला सुरूवात केली. यादरम्यान त्यांनी संयुक्त अरब अमिरात, सऊदी अरेबिया आणि कतार यांचा उल्लेख मध्यस्थी म्हणून केला. मात्र, यादरम्यान कुठेही त्यांनी पाकिस्तानचे नाव घेतले नाही. या युद्धात सुरूवातीपासूनच पाकिस्तान मध्यस्थी करताना दिसला. मात्र, स्वत: अमेरिकेसह इराणने देखील पाकिस्तानच्या मध्यस्थीवर शंका उपस्थित केली.
भारताला खाली दाखवण्यासाठी मुद्द्याम पाकिस्तान पुढे पुढे करत होता. शेवटी आता जोरदार तोंडावर पाकिस्तान आपडल्याचे दिसत आहे. इराणी अधिकाऱ्यांनीही पाकिस्तानचे अमेरिकी प्रेम पाहून त्यांच्यासोबत चार हात दूर राहण्याचा निर्णय घेतला. इराणचे सैन्य विमान पाकिस्तानच्या एअरबेसवर दिसल्यानंतर मोठी खळबळ उडाली आणि तिथेच पाकिस्तानवरील विश्वास अमेरिकेचा उडाला.
अमेरिकेने त्यानंतर पाकिस्तानला धारेवर धरले. इराणने त्यांचे लष्करी विमान अमेरिकेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पाकिस्तान एअरबेसची मदत घेतल्याचे सांगितले जाते. तसे फोटोही पुढे आले. इराण आणि अमेरिका दोघांच्याही जवळ जाण्याच्या नादात पाकिस्तानने आपल्याच हाताने आपली वाट लावून घेतली. ज्यामुळे आता त्यांना युद्धातील मध्यस्थीमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. इराण आणि अमेरिका युद्ध लवकरात लवकर थांबावे, ही संपूर्ण जगाची इच्छा आहे.