
चीनच्या सिचुआन प्रांताच्या एका छोट्याशा गाव वुली एका गावात एक वेगळीच कहाणी समोर आली आहे. ज्यामुळे स्थानिक लोकांसह वैज्ञानिक हैराण झाले आहे.गावातील दोन भावांनी दोन दशकापर्यंत आपल्या घरातून बाहेर जाण्यासाठी सपाट दगडांचा ‘स्टेपिंग स्टोन’ वापर केला, ते दगड वास्तवात १८-१९ कोटी वर्षे जुने डायनासोरच्या पायांचे ठसे निघाले. हे १९९८ मध्ये घडले होते, जेव्हा डिंग बंधू शेतात दगड काढत होते. तेव्हा त्या दगडावर आश्चर्यकारक चिकन क्लॉ सारखे निशान सापडले होते.त्यांना या अजब चिन्हाच्या दगडांना त्यांच्या घराबाहेर पाऊलवाट म्हणून पाय ठेवण्यासाठी अंथरले. त्यामुळे कोणाला अंदाज नव्हता की पायाच्या खाली असलेले दगड इतके प्राचीन असतील. आणि प्राचीन इतिहासकार आणि संशोधकांसाठी एखाद्या खजान्यासारखे असतील.
वुली ज्या जिगॉन्ग शहरात येते, तो असाही चीनचा ‘डायनासोर हब’ असे म्हटला जातो. परंतू या आश्चर्यकारक दगडांचे रहस्य तेव्हा उघडकीस आले जेव्हा या दगडांचे फोटो साल २०१७ मध्ये डिंग कुटुंबियांतील एक मुलीने इंटरनेटवर टाकले. तेव्हा हे फोटो लागलीच व्हायरल झाले आणि लागलीच यावर एक्सपर्टची नजर गेली. त्यानंतर काहीच आठवड्यात रिसर्च टीम गावात पोहचली. त्यानंतर कुटुंबाची परवानगी घेतली तेव्हा या दगडांना म्युझियमला पाठवण्यात आले आणि त्यानंतर याचा पुन्हा अभ्यास करण्यात आला.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या मते ताज्या प्रकाशित संशोधकांच्या रिपोर्टनुसार एकूण आठ दगडांमध्ये ४१३ डायनासोर फुटप्रिंट मिळाले आहे. हा अर्ली ज्युरासिक काळ आहे. जेव्हा पृथ्वीवर आधुनिक पक्ष्यासारखे दोन पायावर चालणारे थेरोपोड डायनासोर फिरायचे. त्यांच्या पायाचे ठशात ग्रेलेटर आणि युब्रोंटेस प्रजातींचे ठसे अधिक आहे.वैज्ञानिकांच्या मते या डायनासोरची चाल आणि गती आधुनिक पक्षांसारखीच होती आणि ते सुमारे ६ ते ९ किमी प्रति तास वेगाने धावत असतील असा अंदाज आहे.
सर्वात रंजक गोष्ट अशी की काही दगडांवर टेल ड्रॅग मार्क देखील सापडले आहे. हे ते ठसे आहेत जेव्हा डायनासोर हळू चालताना कोणत्या वस्तूकडे पाहताना आपली शेपटी जमीनीवर टेकवत असायचे. अशा प्रकारचे ठसे फॉसिड रेकॉर्डमध्ये सापडणे दुर्लभ मानले जाते. स्थानिक सोशल मीडियावर या शोधाने खळबळ उडाली आहे. लोक हैराण आहेत की या बंधूंनी इतकी वर्षे या डायनासोरच्या पायांवर पाय ठेवले होते, परंतू त्यांना हे माहिती नव्हते. एका युजरने लिहिलंय की विचार करा प्रत्येक दिवशी डायनासोरच्या मार्गावर चालणे कसे वाटत असेल ! तर तज्ज्ञांच्या मते हा शोध रंजकच नाही तर वैज्ञानिक दृष्ट्याही खूप महत्वाचा आहे.या सर्व दगडांना सुरक्षितपणे म्युझियममध्ये ठेवले आहे. भविष्यात याव अनेक संशोधन होणार आहे.