AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran: युद्ध सुरू असतानाच इराणचे राष्ट्राध्यक्ष लवकरच अमेरिकेत, जगही बुचकाळ्यात, मोठी अपडेट काय?

Iran-America Update: मध्य-पूर्वेत युद्ध संघर्ष पेटला आहे. हुती आणि सौदी अरबमध्ये युद्धाचा भडका उडला आहे. तर इराण आणि अमेरिकेतही संघर्ष वाढला आहे. त्यातच इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे अमेरिकेच्या दौऱ्यावर जात असल्याने जगही बुचकाळ्यात पडले आहे. काय आहे अपडेट?

Iran: युद्ध सुरू असतानाच इराणचे राष्ट्राध्यक्ष लवकरच अमेरिकेत, जगही बुचकाळ्यात, मोठी अपडेट काय?
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची, डोनाल्ड ट्रम्पImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 18, 2026 | 9:24 AM
Share

Masoud Pezeshkian-Abbas Araghchi-US: आखाती, खाडी देशात युद्धाचा भडका उडाला आहे. इराण- इस्त्रायल-अमेरिका हा संघर्ष सुरू असतानाच हुती आणि सौदी अरबमध्ये यु्द्धाला तोंड फुटले आहे. त्यातच इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे अमेरिकेच्या दौऱ्यावर जात असल्याने जगही बुचकाळ्यात पडले आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने सुद्धा हिरवा कंदिल दाखवला आहे. काय आहे अपडेट?

संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीला हजेरी

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासेभेची(UN General Assembly) वार्षिक बैठक होत आहे. या बैठकीसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची जाणार आहेत. अमेरिका आणि इराण संघर्ष टोकाला पोहचला आहे. इराण अजूनही अमेरिकेला दाद देत नसल्याने ट्रम्प यांचा जळपळाट सुरू आहे. पण पेझेश्कियान आणि अराघची यांच्यासह इराणी शिष्टमंडळाला, प्रतिनिधी मंडळाला संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सहभागी होण्याची परवानगी ट्रम्प प्रशासनाने दिली आहे हे विशेष. यातून भविष्यातील शांतीची बोलणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्हिसा आणि प्रवासाला मंजूरी

संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय हे अमेरिकेतली न्यूयॉर्क शहरात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या करारानुसार, अमेरिकेला सर्व सदस्य देशांच्या प्रतिनिधींना या महासभेला उपस्थित राहण्यासाठी व्हिसा आणि प्रवासाला मंजूरी देणे कायदेशीररित्या बंधनकारक असते. यामुळेच सध्या दोन्ही देशांचे संबंध ताणले गेलेले असले तरी आणि इराणवर निर्बंध लादले असले तरी पेझेश्कियान आणि अराघची यांच्या प्रवासाला आणि व्हिसाला अमेरिकेने परवानगी दिली आहे.

शांतता वार्ता की इराणचा हल्ला?

संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे काय बोलतात याकडे जगाचे लक्ष लागलेले आहे. ते शांततेविषयी बोलतात की अमेरिकेवर टीका करतात याकडे जगाचे लक्ष लागलेले आहे . इराणावरील आर्थिक निर्बंध, अण्वस्त्र धोरण आणि मध्य-पूर्वेतील रक्तरंजित युद्ध यावर इराणी नेते काय भूमिका मांडतात यावर पुढील धोरण निश्चित होईल. तर त्याचवेळी महासभेत सौदी अरब आणि यमनची काय भूमिका असेल याकडे अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...