AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आनंदाची बातमी, अमेरिका भारतावरील टॅरिफ काढण्यास तयार, ही मोठी अट…

भारतावर अमेरिकेने तब्बल 50 टक्के टॅरिफ लावून मोठा झटका दिला आहे. मात्र, अजूनही अमेरिकेपुढे झुकला नाही. हेच नाही तर भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. आता परत एकदा अमेरिकेकडून भारताबद्दल धक्कादायक असे विधान करण्यात आलंय.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आनंदाची बातमी, अमेरिका भारतावरील टॅरिफ काढण्यास तयार, ही मोठी अट...
Donald Trump
| Updated on: Aug 28, 2025 | 8:18 AM
Share

भारतावर 50 टक्के टॅरिफ लावूनही अमेरिकेचे पोट भरले नसल्याचे दिसतंय. आता पुन्हा एकदा अमेरिकेकडून भारतावर थेट गंभीर आरोप करण्यात आली. यावेळी त्यांनी चक्क नरेंद्र मोदी यांचेही नाव घेतले आहे. अमेरिकी डिप्लोमॅट आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी भारत आणि रशियातील तेलाच्या कराराबद्दल धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने रशियाची आक्रमकता वाढताना दिसत आहे. अमेरिकी टॅक्सपेयर्सचे यामुळे मोठे नुकसान होत आहे.

हेच नाही तर त्यांनी रशिया आणि युक्रेनच्या संघर्षाला मोदीचे युद्ध म्हटले आहे. नवारो यांनी भारताला थेट धमकी देत म्हटले की, भारताने जर अजूनही रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले नाही तर भारताला वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. त्यांनी पुढे म्हटले, जर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले तर भारतावरील 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ हा रद्द केला जाईल. शांतीचा मार्ग हा भारताहून जातो…

भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतरही अशाप्रकारची विधाने ही अमेरिकेकडून येताना दिसत आहेत. भारतावरील 25 टक्के टॅरिफ काढण्यासाठी अमेरिका तयार आहे, पण त्यांनी मोठी अट भारताकडे ठेवली आहे. भारताने जर रशियाकडून तेल खरेदी बंद केले तर त्यांच्यावरील 25 टक्के टॅरिफ काढला जाईल. पुढे नवारो यांनी म्हटले की, मला एक गोष्ट खूप जास्त त्रासदायक वाटत आहे ती म्हणजे भारतीय इतके घमंडी कसे आहेत? ते म्हणतात की, आमचा टॅरिफ इतका जास्त नाहीये आणि आम्ही कोणाकडूनही तेल खरेदी करू शकतो. नरेंद्र मोदी हे महान नेते आहेत.

भारताने आता अमेरिकेवरील टॅरिफ काढण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यांनी मोठी अट ठेवली आहे. भारताकडून ही अट कधीच मान्य केली जाणार नाहीये. उलट अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर भारताने रशियासोबत काही महत्वाचे करार केले आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले नाही तर अमेरिका भारतावर अजून कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा