भारतीयांनी मान्य केले नाही तर….अमेरिकेकडून भारताला थेट मोठी धमकी, बाजारपेठेतील वस्तू….
आता पुन्हा एकदा अमेरिकेकडून भारताला अत्यंत मोठी धमकी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि अमेरिकेतील व्यापाराबाबतची चर्चा अद्याप थांबलेली नाही. दोन्ही देशांमधील चर्चेचे दरवाजे खुले आहेत. मात्र, भारताला परत धमकी देण्यात आलीये.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावून मोठा धक्का दिला. हेच नाही तर शेवटपर्यंत भारताकडून टॅरिफमधून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केली गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि अमेरिकेतील व्यापाराबाबतची चर्चा अद्याप थांबलेली नाही. दोन्ही देशांमधील चर्चेचे दरवाजे खुले आहेत. मात्र, असे सांगितले जात असले तरीही भारताला अमेरिकेकडून अजूनही धमकावले जात आहे. एकीकडे चर्चा सुरू असल्याचा दावा केला जात आहे तर दुसरीकडे भारताला धमकावणे सुरूच आहेत.
आता अमेरिकेने अजून एकदा मोठी धमकी दिली आहे. यावेळी बार नॅशनल इकोनॉमिक काऊंसिलचे निदेशक केविन हॅसेट यांनी म्हटले की, भारताने आमचे ऐकले नाही तर अमेरिका कोणताही निर्णय भारताबद्दल घेताना विचार करणार नाही. त्यांनी पुढे म्हटले की, भारत हा आपल्या निर्णयावर कायम राहिला तर मला वाटत नाही की, डोनाल्ड ट्रम्प हे काही ऐकतील. जर भारताने अमेरिकन वस्तूंसाठी भारतीय बाजारपेठ खुली ठेवली नाही तर डोनाल्ड ट्रम्प अजून भारताच्या विरोधात कडक पाऊले उचलतील.
मुळात म्हणजे भारताच्या माध्यमातून रशियावर दबाव टाकला जातोय. अमेरिकन वस्तूंबाबत भारताकडून आता अडवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ते भारतासाठी भारी पडू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. भारतावर टॅरिफ लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्यावर भर द्या आणि स्वदेशी वस्तू वापरा असे म्हटले आहे. शिवाय टॅरिफच्या निर्णयामुळे भारताला मोठा धक्का बसलाय. भारतीय वस्तू टॅरिफमुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत जाऊ शकत नाहीत.
त्यामध्येच आता अमेरिकेकडून एका दावा करण्यात आलाय की, अमेरिकन वस्तू भारतीय बाजारपेठेत जात नाहीत आणि भारताकडून मुद्दाम आता अडवणूक केली जात आहे. याचे वाईट परिणाम भारताला भोगावे लागतील असा थेट इशाराच अमेरिकेकडून देण्यात आल्याचे बघायला मिळतंय. भारत हा चीनसोबत हातमिळवणी करताना दिसत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दाैऱ्यावर जाणार आहेत.
