US Tariff: भारतावरील टॅरिफ हटणार? भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत बिग अपडेट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर 50 टक्के कर लादला आहे. या कराची अंमलबजावणी आज (बुधवार) पासून झाली आहे. मात्र आगामी काळात हा कर कमी होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर 50 टक्के कर लादला आहे. या कराची अंमलबजावणी आज (बुधवार) पासून झाली आहे. मात्र आगामी काळात हा कर कमी होण्याची शक्यता आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि अमेरिकेतील व्यापाराबाबतची चर्चा अद्याप थांबलेली नाही. दोन्ही देशांमधील चर्चेचे दरवाजे खुले आहेत. त्यामुळे जर भविष्यात व्यापाराबाबत करार झाला तर भारतावरील कर कमी होऊ शकतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती असली तरी व्यापार चर्चेबाबत दोन्ही देशांकडून सकारात्मक संकेत मिळाले आहे. त्यामुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाल्यास आणि तोडगा निघल्यास भारताला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कारण 50 टक्के करामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होत आहे, तसेच अमेरिकेत महागाई वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोन्ही देशांवर सध्या संकट आलेले आहे.
भारताची अमेरिकेसह इतरही देशांमध्ये निर्यात
सूत्रांनी सांगितले की, भारताची निर्यात फक्त अमेरिकेवर अवलंबून नाही, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. भारत इतरही देशांसोबत व्यापार करत असल्याने मोठ्या संकटाची शक्यता कमी आहे. सध्या अमेरिकेने भारतावर कर लादला असला तरी भारत आणि अमेरिकेतील व्यापाराबाबतचा संवाद बंद झालेला नाही. याआधीही देशाला अनेक मोठ्या जागतिक आर्थिक धक्क्यांचा सामना करावा लागला होता, त्यामुळे भारत देश कराचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.
दोन्ही देश उपाय शोधण्याच्या प्रयत्नात
करामुळे भारतासह अमेरिकेलाही फटका बसत आहे. कारण अमेरिकेत महागाई वाढू लागली आहे. तसेच भारतानेही आता इतर निर्यातदार देश शोधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात भारताची निर्यात पूर्ववत होण्याची शक्यता आहे. मात्र आता दोन्ही देश यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
करामुळे भारताची निर्यात 70 टक्क्यांनी कमी होणार
अमेरिकेनs भारतावर 50 टक्के शुल्क लादल्यामुळे, भारतातून अमेरिकेला होणार निर्यात 70 टक्क्यांनी म्हणजेच 55 अब्ज डॉलर्सने कमी होण्याची शक्यता आहे. याचा कापड, रत्ने आणि दागिने या क्षेत्रांवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेला आता या व्यापार कराराची गरज आहे.
