AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेतील गुप्तचर ठरले फेल, रायफल घेऊन 20 वर्षांचा युवक घुसला, 120 मीटर लांबवरुन ट्रम्प यांच्यावर गोळी चालवली

Trump Rally Shooting: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला प्रकरणात अमेरिकची गुप्तचर संस्था फेल ठरली. या घटनेची कोणतीही माहिती गुप्तचर यंत्रणेला नव्हती. हल्ला झाल्यानंतर सीक्रेट सर्व्हिसचे कमांडो ट्रम्प यांच्या दिशेने धावत आले आणि त्यांना सर्व बाजूंनी कव्हर केले. त्यानंतर ट्रम्प उठले आणि त्यांच्या समर्थकांकडे हात हलवताना दिसले.

अमेरिकेतील गुप्तचर ठरले फेल, रायफल घेऊन 20 वर्षांचा युवक घुसला, 120 मीटर लांबवरुन ट्रम्प यांच्यावर गोळी चालवली
Donald Trump
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 14, 2024 | 1:15 PM
Share

Trump Rally Shooting: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचारसभेत हल्ला झाला. हल्लेखोराने झाडलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला लागली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. दोन व्यक्ती गंभीर जखमी आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिशेने हल्लेखोराने झाडलेली गोळी 2 सेंटीमीटरनेही आत गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता. हल्लेखोर घटनास्थळावर मारला गेला. घटनास्थळावरून एआर-15 सेमी ऑटोमॅटिक रायफल जप्त करण्यात आली आहे. बेथेल पार्क, पेनसिल्व्हेनिया येथील 20 वर्षीय व्यक्ती थॉमस मॅथ्यू क्रुक्स असे हल्लेखोराचे नाव आहे. यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या कमांडोने हल्लेखोराच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

अशी केली हल्लेखोराने प्लॅनिंग

टम्प ज्या ठिकाणावरुन भाषण देत होते, त्याच्या 120 मीटरवर एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. त्याच्या गच्चीवर हल्लेखोर जाऊन बसला. त्या ठिकाणावरुन त्याने डोनोल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. ज्या ठिकाणी सभा होती, त्या ठिकाणी ओपन स्पेस होती. त्यामुळे हल्लेखोराला गोळी चालवण्यात काहीच अडचण आली नाही. तो गच्चीवरुन ट्रम्प यांना पाहू शकत होतो.

200 मीटर लांबवरुन कारवाई

डोनाल्ड ट्रम्प ज्या ठिकाणावरुन प्रचार सभेत भाषण देत होते, त्याच्या मागे अमेरिकेतील सिक्रेट सर्व्हिसची काउंटर-स्नाइपर टीम तैनात होती. हल्लेखोराने गोळी चालवताच काउंटर-स्नाइपर टीम एक्टिव झाली. या टीममधील कमांडोने जवळपासून 200 मीटर लांबवरुन कारवाई करत हल्लेखोरास गोळ्या घातल्या. ज्या बिल्डींगवर हल्लेखोराचा मृतदेह सापडला ती एजीआर इंटरनॅशनल कंपनीची आहे. या कंपनीत ग्लास आणि प्लास्टिक पॅकेजिंगचे उत्पादन होते.

अमेरिकीतील गुप्तचर यंत्रणा फेल

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला प्रकरणात अमेरिकची गुप्तचर संस्था फेल ठरली. या घटनेची कोणतीही माहिती गुप्तचर यंत्रणेला नव्हती. हल्ला झाल्यानंतर सीक्रेट सर्व्हिसचे कमांडो ट्रम्प यांच्या दिशेने धावत आले आणि त्यांना सर्व बाजूंनी कव्हर केले. त्यानंतर ट्रम्प उठले आणि त्यांच्या समर्थकांकडे हात हलवताना दिसले. त्यानंतर त्यांना कारमध्ये नेण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...