डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावरील 50 टक्के टॅरिफबद्दल खळबळजनक खुलासा, थेट आकडा सांगतच…
डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक निर्णय घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफमधून नेमका किती पैसा कमावला. याबद्दल थेट मोठे विधान केले. ज्यानंतर आता मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहेत. डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, हे सांगणे कठीण आहे. मोठा हल्ला करून व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करून अमेरिकेत आणण्यात आलंय. डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये व्हेनेझुएलातील तेलावर नियंत्रण पाहिजे होते. याकरिता त्यांनी थेट एका देशाच्या अध्यक्षालाच अटक केली. अमेरिकेने केलेल्या या कारवाईनंतर जगात खळबळ उडाल्याचे दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प कोणत्याही परिस्थितीमध्ये जगाची सत्ता स्वत:च्या हातात हवी आहे. डोनाल्ड ट्रम्प एकीकडे रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी शांतता प्रस्ताव देताना दिसत आहेत तर स्वत: दुसरीकडे एका देशावर हल्ला करत आहेत. अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यात जवळपास 40 नागरिकांचा जीव गेला.
भारत हा रशियाकडून तेल खरेदी करतो, हे सांगून अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. भारताने याला विरोध केला. सध्या भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू असून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे, नाही तर अजून टॅरिफ लावला जाईल, असे थेट भाष्य केले. भारतातून अमेरिकेत मोठी निर्यात होत होती. मात्र, अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर ती कमी झाली.
भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर अमेरिका मोठा पैसा कमावत आहे. हेच नाही तर स्वत: आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, भारतावर लावलेल्या टॅरिफच्या माध्यमातून त्यांनी किती पैसा कमावला. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने टॅरिफच्या माध्यमातून 600 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त पैसा कमावला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, आम्ही लवकरच टॅरिफमधून 600 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कमाई करणार आहोत. मात्र, खोट्या बातम्या देणारे लोक यला नकार देत आहेत. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय बाजारपेठ हवी आहे. मात्र, भारतही आपल्या शेतकऱ्यांच्या हिताशिवाय कोणतेही करार करणार नसल्याचे भारताचे स्पष्ट म्हणणे आहे. व्यापार करार पूर्ण होण्यापूर्वी टॅरिफ 15 टक्के करावा, ही प्रमुख मागणी भारताची आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल केलेल्या विधानाने खळबळ उडाली.
