परफ्युमच्या नादात…व्हिसा रद्द, ग्रीनकार्डचे स्वप्न भंग, भारतीय युवकाची दैनावस्था, डोनाल्ड ट्रम्प यांचा उफराटा न्याय

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत तेथे राहणाऱ्या भारतीयांची अवस्था बिकट झाली आहे. अमेरिकेचे स्वप्न पाहून आलेल्या एका तरुणाची अवस्था तेथे अगदी बिकट झाली आहे.

परफ्युमच्या नादात...व्हिसा रद्द, ग्रीनकार्डचे स्वप्न भंग, भारतीय युवकाची दैनावस्था, डोनाल्ड ट्रम्प यांचा उफराटा न्याय
| Updated on: Oct 08, 2025 | 3:15 PM

अमेरिकेत दुसऱ्या टर्ममध्ये डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर वर्षभरातच अशी अवस्था झाली आहे की तेथे राहाणे हा एक प्रकारचा गुन्हा झाला आहे. जे भारतीय लोक आधीपासून येथे राहातात त्यांची परिस्थितीही बिकट होत चालली आहे. असेच काहीसे भारतीय मूळ असलेल्या कपिल रघू यांच्या सोबत झाले आहे. ते अमेरिकेच्या अर्कांसस येथे राहातात. ते त्यांचा व्हिसा बहाल होण्याच्या तारखेची वाट पाहात होते, आणि एका गैरसमजाने त्यांना अटक झाली आणि त्यानंतर त्यांचे आयुष्याला ३६० डिग्रीचे वळण आले.

कपिल रघू याचे एका अमेरिकन मुलीशी लग्न झाले आहे आणि त्यांना आता ग्रीन कार्ड मिळणार होते. याच दरम्यान ३ मे रोजी त्यांच्यासोबत असे काही घडले की ज्याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. त्यांच्या कारमधील एका छोट्या परफ्युमच्या बाटलीने त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला आणि ते त्यांच्या पत्नी सोबत रहाण्यासाठी संघर्ष करत आहेत. पोलिसांनी बाटलीवर लिहिलेल्या परफ्युमच्या ब्रँडच्या नावाने त्यांना नशेची वस्तू बाळगल्या प्रकरणात विना चौकशी तुरुंगात टाकण्यात आले.

परफ्यूम पाहाताच पोलिसांनी जेलमध्ये टाकले

कपिल रघु त्यांच्या कारची डिलिव्हरी देण्यासाठी जात होते. त्याचवेळी त्यांची कारला रुटीन चौकशीसाठी ट्रॅफीक स्टॉपवर अडवले. पोलिसांनी तपासणीत त्यांच्या कारमध्ये एक परफ्युमची बाटली सापडली. त्यावर “Opium” असे ब्रँडचे नाव छापले होते. ओपियमचा हिंदीतील अर्थ अफू असा होतो. रघू यांनी समजावले की ही परफ्युमच्या ब्रँडचे नाव आहे. बाटलीत कोणतेही नशेचे द्रव्य नाही.तरीही पोलिसांनी त्यांना ड्रग्ज बाळगल्याच्या प्रकरणात जेलमध्ये टाकले. स्थानिक वृत्तपत्र The Saline Courier शी बोलताना त्यांनी सांगितले की पोलिसांनी त्यांनी सर्व काही सहकार्य केले, परंतू पोलिसांनी त्यांचे काहीही ऐकले नाही.

लॅबोटरीचा अहवाल आला

नंतर र्कांसस स्टेट क्राईम लॅबोटरीचा अहवाल आला आणि त्या बाटलीत परफ्युम असल्याचे निष्पन्न झाले. तरीही रघु नव्या संकटात सापडले. तीन दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची तपासणी होत होती तेव्हा व्हिसाच्या अर्जात वकीलाकडून झालेल्या एक चुकीमुळे त्यांचा व्हिसाच रद्द झाला. त्यामुळे रघू यांना युएस इमिग्रेशन एण्ड कस्टम इन्फोर्समेंट फॅसिलिटी सेंटरमध्ये ३० दिवसासाठी पाठवण्यात आले. रघु यांचे वकील लॉक्स यांनी सांगितले की रघू यांना डिपोर्टेशनच्या रिस्कवर सोडण्यात आले आहे. आता त्यांच्याकडून एकही चूक झाली तर त्यांना भारतात डिपोर्ट केले जाऊ शकते.

घर घेण्याचे स्वप्न भंग झाले

रघू यांची अमेरिकन पत्नी एल्हले मेज तीन-तीन नोकरी करुन घराचा खर्च आणि वकीलांची फी कशी तरी जमा करत आहे. एप्रिलमध्ये रघू आणि तिचे लग्न झाले होते. त्यांनी घर विकत घेण्यासाठी जे पैसे राखून ठेवले होते ते आता लिगल प्रोसेसवर खर्च होत आहेत. हा सर्व कायद्याच्या चूकीचा फटका आहे.रघू यांचे वकीलांचे म्हणणे आहे की पोलिसांनी ही बाब भारतीय दूतावासालाही कळवली नसून हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे.