युद्धाने गाझाची जमिनी नापिक झाली, पुन्हा पिकं घेण्यासाठी 25 वर्षे लागतील, UN चा धक्कादायक अहवाल
गाझा युद्धाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या युद्धात गाझाचे अक्षरश: स्मशान झाले आहे. येथील 80% इमारती नष्ट झाल्या आहेत. ढीगारा उपसायलाच 10 वर्षे जातील. तब्बल 66,158 पॅलेस्टीनी मारले गेले असून त्यात 18,430 लहान मुलांचा समावेश आहे. गाझाचे पुनर्निमाणात प्रचंड अडचणी असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.

हमासने इस्राईलवर हल्ला केल्यानंतर इस्राईलने गाझापट्टीत युद्ध सुरु केलेल्या घटनेला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहे. संयुक्त राष्ट्राने गाझाच्या झालेल्या नुकसानाचा अहवाल आज जाहीर केला आहे. या अहवालात गाझापट्टीतील इमारतींचे तुटलेल्या भाग आणि इतर ढीगारा उपसायलाच दहा वर्षे लागणार असल्याचे म्हटले आहे. तसेच येथील जमीन पुन्हा पिकांसाठी योग्य बनवण्यासाठी तब्बल 25 वर्षे खर्ची पडणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. मिसाईल आणि विविध शस्रास्रांमुळे गाझापट्टीची जमीन अक्षरश: नापिक झाली असून येथील जीवन पुनर्निमार्ण करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात गाझाच्या 80% इमारती कोसळल्या आहेत. यात 4.5 ट्रिलियन डॉलर म्हणजे 373.5 लाख कोटीच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. या युद्धाने गाझा शहराचे चित्रच बदलून गेले आहे. त्यामुळे लोकांना मुलभूत सुविधा मिळणे आणि शरण येणे दुर्लभ झाले आहे. गाझात दोन वर्षात 5.1 कोटी टनाचा ढीग जमा झाला आहे.ज्याला हटवण्यासाठी 99.6 लाख कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.
पुननिर्मितीसाठी खूप वेळ लागणार
येथील पडलेल्या इमारतीचे ढीग हटवण्यासाठी लागणारी सामुग्री पोहचणेच कठीण झाले. त्यामुळे हा ढीग उपसून तेथे पुननिर्मितीसाठी खूप वेळ लागणार आहे. यात केवळ निवासी इमारतीच नष्ट झाल्या असे नव्हे तर कृषी जमीनही नापिक झाली आहे. गाझातील 1500 एकर शेत जमीनीवर वाईट परिणाम झाला आहे. केवळ 232 जमीन शेतीलायक उरली आहे. ज्या 98.5% जमीनीवर आधी शेती व्हायची ती आता काही कामाची राहिली नाही.
शेतीयोग्य जमीन न राहल्याने अन्नसुरक्षा आणि उपजिवेकेवर संकट आले आहे. गाझाची जमीन सुपिक मानली जात होती.कोणत्याही पिकांसाठी योग्य वातावरण होते.इस्राईल – हमास युद्धापूर्वी गाझा 2022 मध्ये पिके निर्यातही करत होता. ज्यात एक तृतीयांश (32%) स्ट्रॉबेरी, 28% टोमॅटो आणि 15% काकडी अशा फळ भाजांचा समावेश होता. अन्य उत्पादनात वांगी (9%),गोड मिर्ची (6%), तोंडली (3%),मिरची(2.5%),बटाटे (1%) आणि रताळी (0.5%) चा समावेश होता.
गाझाच्या जमीनीत खतरनाक केमिकल
इस्रायली हल्ल्यांमुळे 83% सिंचन विहिरी बंद झाल्या आहेत.यात प्रदुषण पसरले आहे. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार विस्फोटकाने गाझाच्या जमीनीतील केमिकलची पातळी तीन पट वाढली आहे. इस्राईल हल्ल्यात 94% हॉस्पिटल आणि 90% शाळा नष्ट झाल्या आहेत. आधी गाझात 36 हॉस्पिटल वर्किंग कंडीशनमध्ये होते. गाझातील 23 लाख लोकसंख्येपैकी 90% लोकसंख्या बेघर झाली आहे.80% भागाला मिल्ट्री झोन म्हणून जाहीर केले आहे. अर्ध्याहून अधिक लोकसंख्या कुपोषणाची शिकार झाली आहे.
इस्राईल आणि पॅलेस्टाईनचे किती नुकसान
7 ऑक्टोबर 2023 ला हमासने इस्राईलवर हल्ला केला. त्यात 1200 इस्राईली ठार झाले. हमासने 251 लोकांना ओलीस ठेवले. इस्राईलचा आरोप आहे की यातील 48 ओलीसांना हमासने परत केले नाही. त्या 48 पैकी 20 ओलीसच जीवंत राहिले आहेत. इस्राईलच्या जबाबी कारवाईत आतापर्यंत 66,158 पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले आहेत.यात 18,430 लहान मुले आहेत. 39, 384 मुलांनी आपल्या आई-वडीलांपैकी एकाला गमावले आहे. या युद्धाचा समाज, अर्थव्यवस्था, आणि पर्यावरणावरील परिणाम दशकांहून दशके जाणवणार आहे.
