AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महासंकट, थेट 19 राज्यांची कोर्टात धाव; अमेरिकेत मोठी खळबळ

डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर कठोर निर्बंध लादली आहेत. त्यापैकी भारत एक आहे. भारतावर काहीही कारण नसताना रशियाच्या तेलाचा मुद्दा उपस्थित करत भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. आता डोनाल्ड ट्रम्प यांना अत्यंत मोठा धक्का बसला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महासंकट, थेट 19 राज्यांची कोर्टात धाव; अमेरिकेत मोठी खळबळ
Donald Trump
| Updated on: Dec 13, 2025 | 11:38 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. भारतावर टॅरिफ लावताना त्यांची दुटप्पी भूमिका जगाने बघितली. रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करणाऱ्या चीनवर त्यांनी अतिरिक्त टॅरिफ लावला नाही. मात्र, भारताबाबत शुल्क कारण देत त्यांनी 50 टक्के टॅरिफ लावला. डोनाल्ड ट्रम्प जवळपास त्यांच्या विरोधात जाणाऱ्या सर्वच देशांवर टॅरिफ लावताना दिसत आहेत. टॅरिफची धमकी सातत्याने देत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला फक्त जगातूनच नाही तर थेट अमेरिकेतूनही मोठा विरोध होत आहे. लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात कोर्टात जात आहेत. आता नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांना अत्यंत मोठा धक्का बसला असून थेट तीन खासदार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मैदानात उतरली आहेत. भारतावरील 50 टक्के टॅरिफ काढण्याची या तीन खासदारांनी मागणी केली.

अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या तीन सदस्यांनी शुक्रवारी एक ठराव मांडला. याचा उद्देश ट्रम्प यांच्या राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेचा अंत करणे हाच आहे. भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 50 टक्क्यांपर्यंत शुल्क अमेरिकेने लावले. संसद सदस्यांनी हे शुल्क बेकायदेशीर असल्याचे म्हटले. कामगार, ग्राहक आणि अमेरिका-भारत संबंधांना हानी पोहोचवत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले.

हा ठराव अमेरिकन खासदार डेबोरा रॉस, मार्क वेसी आणि राजा कृष्णमूर्ती यांनी मांडला आहे. फक्त भारतच नाही तर ब्राझीलवरही लावण्यात आलेला टॅरिफ रद्द करावा, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या प्रस्तावानुसार, भारतावर लादलेला अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ हा हटवला पाहिजे. डेबोरा रॉस, मार्क वेसी आणि राजा कृष्णमूर्ती यांनी खासदार रो खन्ना आणि काँग्रेसच्या इतर 19 सदस्यांसह, अध्यक्षांना भारतावर लादलेले शुल्क मागे घेण्याचे आणि ताणलेले द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे आवाहन केले होते.

19 राज्यांनी थेट कोर्टात या निर्णयाच्या विरोधात धाव घेतल्याचीही माहिती मिळत आहे. यामुळे अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. आता भारतावरील टॅरिफ हटवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील दबाव हा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळत आहे. जर असाच दबाव डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायम राहिला तर डोनाल्ड ट्रम्प यांना भारतावरील टॅरिफचा निर्णय मागे घ्यावा लागू शकतो.

Follow Us
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला