AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना थेट फोन, पंतप्रधान नरेंद्र मोदींना..

टॅरिफचा वाद टोकाल असतानाच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अमेरिकेकडून भारतावर टॅरिफसाठी दबाव कायम आहे. डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या माध्यमातून भारताला धमकी देत आहेत. भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ हा अमेरिकेकडून लावण्यात आला.

भारताला धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना थेट फोन, पंतप्रधान नरेंद्र मोदींना..
Donald Trump and Vladimir Putin
| Updated on: Aug 19, 2025 | 9:09 AM
Share

भारत आणि अमेरिकेत टॅरिफच्या मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच आता मोठ्या घडामोडींना वेग आलाय. डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांच्यात काल बैठक झाली. या बैठकीला सात महत्वाचे नेते देखील उपस्थित होते. ही बैठक रशिया आणि युक्रेनच्या युद्धाच्या मुद्यावर होती. या बैठकीतून सकारात्मक तोडगा निघाल्याच बोलले जातंय. मात्र, बैठक सुरू असतानाच अचानक असे काही घडले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट पुतिन यांना फोन केला आणि त्यांच्यासोबत संवाद साधला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुतिन यांनी फोन केला. आता लवकरच डोनाल्ड ट्रम्प, वोलोदिमीर जेलेंस्की आणि पुतिन यांच्यात बैठक होईल.

युक्रेनला त्यांच्या सुरक्षेची हमी पाहिजे आहे. डोनाल्ड ट्रम्प या मिटिंगमध्ये काही मुद्द्यावरून दादागिरी वोलोदिमीर जेलेंस्की यांंच्यावर करत असल्याचे सांगितले जातंय. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबण्याची दाट शक्यता आहे. युक्रेनकडून स्पष्ट करण्यात आले की, जोपर्यंत त्यांच्या सुरक्षेची हमी दिली जात नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून हे युद्ध थांबवले जाणार नाहीये. युक्रेनचा नाटोमध्येही समावेश होणार नाही. ही रशियाची अट आहे.

दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर सातत्याने टॅरिफसाठी दबाव टाकला जात असतानाच पुतिन यांनी थेट मोदींना फोन केला. यामुळे या टॅरिफच्या मुद्द्यावरून काहीतरी मार्ग निघण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल धक्कादायक विधाने करत आहे तर दुसरीकडे पुतिन यांच्यासोबतची जवळकता वाढवत आहेत. यामुळे भारताच्या विरोधात ते मोठा डाव टाकताना दिसत आहेत. मात्र, अमेरिकेतील बैठकीनंतर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला.

हेच नाही तर त्यांनी म्हटले की, भारताला टॅरिफशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. परत भारताला धमकी देण्यात आलीये. आता टॅरिफच्या मुद्द्यावर भारत काय भूमिका घेतो, याकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत. भारत आणि अमेरिकेच्या व्यापार कराराबद्दल होणारी मिटिंग देखील अमेरिकेकडून रद्द करण्यात आली आहे. ही मिटिंग दिल्लीमध्ये होणार होती. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादण्यात आला आहे. भारत हा अजूनही अमेरिकेच्या पुढे झुकला नाहीये.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा