देशाचे वाटोळे होणार, सैन्य शक्तीही संपणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा, टॅरिफच्या मुद्यावर पुन्हा..

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टॅरिफच्या मुद्द्यावरून जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने धमक्या देताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे थेट कोर्टाला देखील धमकावताा दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बेकायदेशीर असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

देशाचे वाटोळे होणार, सैन्य शक्तीही संपणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा, टॅरिफच्या मुद्यावर पुन्हा..
Donald Trump
| Updated on: Sep 01, 2025 | 7:57 AM

डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या कोर्टाने जोरदार धक्का दिल्यानंतरही ते सुधारल्याचे दिसत नाही. टॅरिफच्या मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने फटकारले आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंतच टॅरिफ असेल असे कोर्टाने एका याचिकेवर सुनावणी करताना म्हटले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हे थेट कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांचा चुकीचा वापर करत आहेत, असे कोर्टाने टॅरिफच्या मुद्यावरून म्हटले. यावर डोनाल्ड ट्रम्प भडकले असून त्यांनी म्हटले की, टॅरिफ लावला नाही तर देशाच वाटोळे होईल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले, टॅरिफशिवाय आपण खरबो डॉलर जमा नाही करू शकत. यामुळे आपल्या देशाची वाट लागेल आणि देश बर्बाद होईल. हेच नाही तर आपली सैन्य शक्ती देखील संपेल. अमेरिकेतील कोर्ट ऑफ अपिल्स फॉर द फेडरल सर्किटने डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले टॅरिफ बेकायदेशीर असल्याचे म्हटले. कोर्टाने स्पष्ट म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांना असा कोणताही अधिकार नाही की, ते टॅरिफ लावू शकतात. आता थेट कोर्टालाच धमकावताना डोनाल्ड ट्रम्प हे दिसत आहेत.

फक्त भारतच किंवा इतर देशच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाला सर्वत्र विरोध होताना दिसत आहे. मागील काही वर्षात भारत आणि अमेरिकेतील संबंध सुधारताना दिसले. मात्र, या टॅरिफच्या मुद्यामध्ये दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. शिवाय अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्याने भारत आणि चीनमध्ये जवळीकता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पुतिन हे दोघेही थेट चीनच्या दाैऱ्यावर आहेत. या दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत.

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहकारी हे भारताबद्दल वारंवार धक्कादायक विधाने करताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता मोठा दबाव टाकला जात आहे. शिवाय भारताला धमकावले जात आहे. भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नसल्याने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला असून युरोपियन देशांना भारताला गॅस आणि तेल निर्यात बंद करण्याचे आदेशही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहेत.