जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताच्या तेल खरेदीबद्दल अत्यंत मोठा दावा, थेट म्हणाले, रशिया…

डोनाल्ड ट्रम्प हे पुढच्या वर्षी भारताच्या दाैऱ्यावर येणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता नुकताच भारताच्या तेल खरेदीबाबत खळबळजनक दावा केला आहे. रशियाकडून भारताने तेल खरेदी बंद करावी, याकरिता ते आग्रही आहेत.

जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताच्या तेल खरेदीबद्दल अत्यंत मोठा दावा, थेट म्हणाले, रशिया...
Donald Trump
| Updated on: Nov 07, 2025 | 9:38 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर त्यांनी लवकरच भारताच्या दाैऱ्यावर येणार असल्याचे म्हटले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली असून त्यांनी मला तिकडे येण्यास सांगितले. एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढून असे त्यांचे म्हणणे आहे आणि मी देखील तिकडे जाईल. डोनाल्ड ट्रम्प पुढच्या वर्षीच्या सुरूवातीला भारताच्या दाैऱ्यावर येऊ शकतात. अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावात आहेत. व्यापार चर्चा सुरू असून त्यामधून मार्ग निघत नाहीये. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता अमेरिका सुरूवातीपासूनच आग्रही आहे. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या तेल खरेदीबद्दल अत्यंत मोठे विधान केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाकडून तेल खरेदी करणे जवळजवळ बंदच केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली. भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली होती. मात्र, काही दिवसांपासून भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगितले जातंय. त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला.

भारतातील दोन मोठा तेल रिफायनरी कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतली. त्यामध्येच अमेरिकेने रशियाच्या दोन तेल कंपन्यांवर बंदी घातली. त्यामुळे रशियातून भारतात होणारी तेल निर्यात कमी झाल्याचे बघायला मिळाले आणि त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल खरेदीबद्दल मोठा दावा केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळेच भारताने तेल खरेदी बंद केली का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय.

ते माझे मित्र आहेत, मी त्यांच्याशी बोलेन मी भारतात जाईल, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भारताला चर्चा करायची आहे. अमेरिकेने भारतावर लावलेले 50 टक्के टॅरिफ यामुळे भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाली असून मोठे नुकसान होत आहे. दुसरीकडे रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यासाठी अमेरिकेचा दबाव असल्याने भारताला पूर्वीप्रमाणे तेल खरेदी करता येत नाही. याचाही फटका बसण्याची शक्यता आहे.