भारताबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत मोठी घोषणा, पुढच्या वर्षी…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून मोठे निर्णय घेत आहेत. भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतर त्यांनी थेट घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतरही दोन्ही देशांमधील संबंध चांगले असल्याचा दावा करतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प जगाला हादरवणारे निर्णय घेत आहेत. भारतावर 50 टक्के टॅरिफ मित्र असल्याचे सांगून त्यांनी लावला. भारत अमेरिकेचे संबंध चांगले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असल्याचे सांगताना डोनाल्ड ट्रम्प दिसतात. मात्र, दुसरीकडे भारताला विविध प्रकारे अडचणीत आणण्याचे काम करतात. नुकताच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची त्यांची चर्चा खूप जास्त चांगली झाली. यासोबतच त्यांनी मोठी घोषणा यादरम्यान केली. दोन्ही देशांमधील व्यापार संबंध मजबूत करण्याच्या प्रयत्नांसाठी मी भारताच्या दाैऱ्यावर पुढील वर्षी जाणार आहे.
नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी हे माझे खूप जास्त चांगले मित्र आहेत. त्यांच्यासोबत माझी खूप जास्त चांगली चर्चा सुरू आहे. वॉशिंग्टन आणि नवी दिल्ली यांच्यातील ऊर्जा आयातीवरील करार वाढत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदी मला म्हणाले तुम्ही इकडे आले पाहिजे, त्यांनी मला बोलावले आहे आणि मी जाणार आहे.
रशियाकडून तेल खरेदी करणे जवळपास भारताने बंद केले आहे, त्यांच्या प्रशासनाने रशियन ऊर्जा खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाई केली आहे. पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी थांबवली आहे. ते माझे मित्र असून पंतप्रधान नरेंद्र मोदी महान व्यक्ती आहेत. त्यांना वाटते की, मी आले पाहिजे आणि त्यामधून आम्ही पर्याय काढला पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महान व्यक्ती असून मी नक्कीच जाईल. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आले की, पुढच्या वर्षी तुम्ही भारतात जाणार का? यावर त्यांनी होकार दिला. डोनाल्ड ट्रम्प पुढच्या वर्षी भारताच्या दाैऱ्यावर असणार असल्याचे स्पष्ट आहे. मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या दाैऱ्यावर येणार असल्याचे स्पष्ट आहे.
