मला टॅरिफवर प्रेम… डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिल्यांच मोठा खुलासा, म्हणाले, श्रीमंत होण्यासाठी…

Donald Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून प्रत्येक गोष्टीवर टॅरिफ लावताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच मोठा खुलासा केला असून टॅरिफ शब्दावर मला प्रेम असल्याचे थेट म्हटले.

मला टॅरिफवर प्रेम... डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिल्यांच मोठा खुलासा, म्हणाले, श्रीमंत होण्यासाठी...
Donald Trump Tariffs
| Updated on: Oct 01, 2025 | 1:01 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून सतत टॅरिफ लावण्याची भाषा करत आहेत. भारत आणि ब्राझीलवर तब्बल 50 टक्के टॅरिफ डोनाल्ड ट्रम्प यांनी लावला. हेच नाही तर अमेरिकेत आयात होणाऱ्या फार्माच्या वस्तूंना 100 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय त्यांनी घेतला. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावत असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, भारताच्या आजुबाजूच्या देशांवर हा टॅरिफ लावण्यात आला नाही. चीन हा भारतापेक्षा कितीतरी जास्त पट ऱशियाकडून तेल खरेदी करतो. मात्र, त्या चीनवरही त्यांनी कोणत्याही प्रकारचा टॅरिफ लावला नाही. भारताला अडचणीत आणण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाचा नियम बदलला. आता H-1B व्हिसासाठी तब्बल 88 लाख रूपये भरावी लागणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या अटी मान्य करण्यासाठी टॅरिफच्या धमक्या देताना दिसत आहेत. आता नुकताच डोनाल्ड ट्रम्प  यांनी टॅरिफबद्दल मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, माझा सर्वात आवडता शब्द टॅरिफ आहे. इंग्रजी शब्दकोषमधील टॅरिफ हा सध्या माझा आवडता आणि सुंदर शब्द आहे. अमेरिकेला प्रगतीपथावर नेण्यासाठी टॅरिफचे श्रेय आहे. माझा हा आवडतीचा शब्द आहे. कारण यामुळे आपण खूप जास्त श्रीमंत बनत आहोत.

दुसरे देश अनेक वर्षांपासून अमेरिकेचा फायदा घेत आहेत. टॅरिफमुळे खरबो डॉलर कमावत आहोत आणि श्रीमंत होत आहोत. जे लोक अमेरिकेचा फायदा घेत होते, त्यांच्यासोबत आता आपण योग्य व्यवहार करत आहोत. सध्या जे पैसे येत आहेत, ते यापूर्वी कधीही आले नाहीत. मागील काही दिवसांपासून 31 अरब डॉलर मिळाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता चित्रपटांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला.

भारतीय फार्मा कंपन्यांचे अमेरिका ही मोठी बाजारपेठ होती. मात्र, अमेरिकेने 100 टक्के टॅरिफ फार्माच्या वस्तूंवर लावल्याने फार्मा कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. यातून मार्ग काढणे कठीण झालंय. हेच नाही तर आता अमेरिकेत शूटिंग करणेही महागात झालंय. डोनाल्ड ट्रम्प हे प्रत्येक गोष्टीवर टॅरिफ लावताना दिसत आहेत. त्यामध्येच त्यांनी टॅरिफबद्दल मोठे विधान केले.