AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरवणारा डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट दावा, मोठी खळबळ, थेट म्हणाले, 11 जेट…

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव बघायला मिळाला. दोन्ही देशात युद्धे सुरू झाले. परिस्थिती अधिक बिघडत होती. दोन्ही देशांकडून हल्ले सुरू होते. आता भारत आणि पाकिस्तान युद्धाबाबत अत्यंत मोठा दावा करण्यात आला.

जग हादरवणारा डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट दावा, मोठी खळबळ, थेट म्हणाले, 11 जेट...
Donald Trump
| Updated on: Feb 20, 2026 | 7:56 AM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय दावा करतील, याचा अजिबातच नेम नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या जगातील अनेक देशांना नाकीनऊ आणले. त्यांना वाटेल ते निर्णय घेतात आणि संबंधित देशाने त्यांचा निर्णय मान्य केला नाही की, लगेचच टॅरिफ लावला जातो. नक्कीच अमेरिका जगातील महासत्ता देश आहे, पण ज्याप्रकारे अमेरिका इतर देशांवर निर्बंध लादत आहे आणि धमकावत आहे ते चुकीचे नक्कीच आहे. याचा थेट परिणाम संबंध देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने दावे केली जात आहेत की, मी जगातील मोठी तब्बल 7 युद्धे रोखली आहेत. त्यापैकी त्यांच्याकडून भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या नावाचा उल्लेख वारंवार केला जातो. पहलगामवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती होती. भारतीय लोकांचे जीव पहलगाम हल्ल्यात गेल्याने लोकांमध्ये मोठा संताप होता.

यारम्यान भारताने थेट ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानात घुसून तेथील दहशतवाद्यांचे हल्ले नष्ट केली. यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती होती. दोन्ही बाजूने हल्ले सुरू होती. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलताना मोठा दावा याबद्दल केला आहे. बोर्ड ऑफ पीसमध्ये बोलताना पुन्हा दावा करत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ज्यावेळी खूप सारा पैसा डुबण्याची वेळ आली त्यावेळी त्यांना वाटले की, आपण लढले नाही पाहिजे. 11 जेट पाडले होते आणि ते खूप जास्त महाग होते, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानबद्दल केला. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, सैन्य मध्यस्थी नाही तर आर्थिक दबाव टाकण्यात आला. मी दोन्ही देशांच्या नेत्यांना फोनवरून चेतावणी दिली.

जर तुम्ही हे युद्ध थांबवले नाही तर अमेरिकेसोबतचे सर्व व्यापारी संबंध तुमचे संपतील. जर तुम्ही असेच युद्ध सुरू ठेवले तर मी 200 टक्केट टॅरिफ लावेल. त्यानंतर हे युद्ध थांबले. भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध मीच थांबवले असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार केला जात आहे. मात्र, भारताने यापूर्वीच सांगितले की, दोन्ही देशांच्या उच्च लष्कर अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन युद्ध थांबवले. यामध्ये कोणत्याही देशाची भूमिका नाही.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार