
डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत दावा करत आहेत की, त्यांनी जगातील मोठी सात युद्ध रोखली आहेत. त्यामध्येच त्यांनी गाझा आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धादरम्यान 20 कलमी प्रस्ताव ठेवलाय. विशेष म्हणजे या प्रस्ताव हमाससह काही मुस्लिम देशांनी एकत्र येऊन तयार केला. इस्त्रायलचे पंतप्रधान अमेरिकेला पोहोचले आणि त्यांनी आपल्याला हा प्रस्ताव मंजूर असलयाचे स्पष्ट म्हटले. मात्र, हमास अजूनही या प्रस्तावावर राजी होत नाहीये. हमासला दोन ते तीन दिवसांचा वेळ देऊ पुढे जे काही होईल, त्याला हमासच जबाबदार असल्याचे म्हणत थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली. हेच नाही तर इस्त्रायलला मग पूर्ण सूट मिळेल, असेही त्यांनी म्हटले.
काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प युक्रेन-रशिया युद्धात देखील मध्यस्थी करत होते. मात्र, रशियाने त्यांना दाद दिलीच नाहीत. त्यांनी थेट रशियाला परमाणू हल्ल्याची धमकी दिली. डोनाल्ड ट्रम्प बऱ्याचदा नोबेल पुरस्कारावर दावा करताना दिसले. त्यांना नोबेल शांती पुरस्कार हवाय, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आतापर्यंत जगातील तब्बल सात युद्ध थांबवली आहेत. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पुरस्काराबद्दल मोठे विधान केले.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मला नोबेल शांती पुरस्कार नाही पाहिजे, मला फक्त गाझामध्ये शांती हवी आहे आणि हेच माझे लक्ष आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, युद्धबंदी जवळपास निश्चित आहे. यामध्ये सर्व मुस्लिम देशही सहभागी आहेत. आम्ही सर्व गोष्टी केल्या आहेत, आता वाट पाहत आहोत ती म्हणजे हमासची. जर हमासने त्या प्रस्तावावर सही केली नाही तर त्यांना अत्यंत वाईट परिणाम भोगावे लागतील.
जर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हमासने तो प्रस्ताव मंजूर केला नाही आणि सही केली नाही तर मग आम्ही इस्त्रायलला पूर्ण सूट देणार आहोत. त्यांना जे करायचे ते करू शकतात. जर हमासने हा प्रस्ताव मान्य केला नाही तर त्यांना नर्कात देखील किंमत मोजावी लागेल. आम्ही आतापर्यंत 25 हजार हमासच्या दहशतवाद्यांना मारले आहे, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्ह्टले. पहिल्याच डोनाल्ड ट्रम्प हे मला नोबेल पुरस्कार नको असे म्हणताना दिसले.