AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 विमान पडली होती… डोनाल्ड ट्रम्प यांचा डोक्यातून मुंग्या आणणारा दावा, भारत-पाक युद्धात…

डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून भारत पाकिस्तान युद्धाबद्दल काही दावे करताना दिसत आहेत. भारताने अगोदरच स्पष्ट केले की, भारत-पाक युद्धात दुसऱ्या कोणत्याही देशाने हस्तक्षेप केल्याने हे युद्ध थांबले नाही. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलाय.

7 विमान पडली होती... डोनाल्ड ट्रम्प यांचा डोक्यातून मुंग्या आणणारा दावा, भारत-पाक युद्धात...
Donald Trump India Pakistan War
| Updated on: Oct 07, 2025 | 9:59 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारत-पाकिस्तान युद्ध मी रोखल्याचा दावा करत आहेत. नुकताच त्यांनी परत एकदा हे युद्ध आपण थांबवल्याचे म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, जर माझ्याकडे टॅरिफची शक्ती नसती तर जगातील कमीत कमी 7 पैकी 4 युद्धे अजूनही सुरू असती. तुम्ही भारत-पाकिस्तानचे युद्ध बघितले असेल तर त्यांनी 7 विमाने पाडली होती आणि त्या दिशेने त्यांचे युद्ध सुरू होते. पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले, टॅरिफमुळे फक्त आर्थिक फायदाच होत नाहीये तर जगात शांतता देखील आहे.

मी ते एकदम करू इच्छित नक्कीच नाही. आम्ही फक्त अरबो डॉलरमध्ये कमाई करत नाहीत तर टॅरिफमुळे शांतता प्रस्तापित करण्यास मोठी मदत होत आहे. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्धाबद्दल दावा करताना दिसले आहेत. मात्र, यापूर्वी बऱ्याचदा भारताने स्पष्ट केले की, अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे नाही तर व्दिपक्षीय संबंधांमुळे भारत-पाक युद्ध थांबले आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला.

रिपोर्टनुसार, लवकरच भारत-अमेरिकेत व्यापार करार होईल आणि परिस्थिती अगोदरप्रमाणे सुरळीत होईल. डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तान यांच्यातील जवळीकता मागील काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतरही भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. टॅरिफ लावल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प भारताबद्दल वेगवेगळ्या प्रकारची दावे करताना दिसतात. त्यामध्येच त्यांनी पुन्हा भारत-पाकिस्तान युद्धावर भाष्य केले.

डोनाल्ड ट्रम्प एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे खूप जास्त चांगले मित्र आहेत आणि भारत- अमेरिकेतील संबंध मजबूत आहेत, सांगताना दिसतात. मात्र, दुसरीकडे भारताला अडचणीत आणण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. त्यांनी H-1B व्हिसाबद्दलही अत्यंत धक्कादायक असा निर्णय घेतला. भारतीय लोक मोठ्या प्रमाणात H-1B व्हिसावर गेली आहेत आणि तिथे नोकऱ्या करतात. मात्र, आता H-1B व्हिसासाठी तब्बल 88 लाख रूपये शुल्क आकारले आहे. ज्यानंतर आयटी कंपन्यांना मोठा धक्का बसला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...