
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून भारताला टार्गेट करताना दिसत आहेत. हेच नाही तर त्यांनी आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर टीका केलीये. ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, मी पुतिन यांच्यावर खूप जास्त निराश आहे. पुतिन हे रशिया आणि युक्रेन युद्ध संपवण्यापासून रोखत आहेत. ट्रम्प पुढे म्हणाले, मी अध्यक्ष झाल्यावर मला वाटले होते की, मी सर्वात अगोदर रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता करार करेल. हेच नाही तर पुतिन आणि माझ्यामध्ये असलेल्या संबंधांमुळे हे युद्ध संपवणे अधिक सोप्पे मला वाटले होते. सध्या परिस्थिती अशी आहे की, पुतिन हे खूप जास्त लोक मारत आहेत. रशियाचे सैनिक देखील या युद्धात मोठ्या संख्येने मरत आहेत.
यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांना रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धासाठी जबाबदार ठरवले. हेच नाही तर पुतिन यांना हे युद्ध थांबवायचे नसल्याचे म्हणताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. डोनाल्ड ट्रम्प हे युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, या युद्धासाठी ते भारतासह चीनला जबाबदार ठरवत आहेत. त्यांनी काही गंभीर आरोप करत भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. हेच नाही तर युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा शांतीचा मार्ग दिल्लीहून जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने युक्रेनी नागरिकांचे जीव जात आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो आणि त्यावर रिफायनरी करून जगभरात विकतो. त्या माध्यमातून मोठा पैसा भारताला मिळतो. भारत अमेरिकेतही मोठ्या प्रमाणात वस्तू निर्यात करतो. अमेरिकेतून मिळालेला पैसा तेल खरेदीसाठी रशियाला देतो आणि रशिया याच पैशातून युक्रेनी नागरिकांच्या विरोधात मशिन खरेदी करून युद्ध पुढे सुरू ठेवतो.
भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी. आम्ही त्यांच्यावरील 25 टक्के टॅरिफ हा लगेचच काढून टाकतो. भारताने अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतरही रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली आहे. अजूनही अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. आता डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तान आणि बांगलादेशाला हाताशी धरून भारतावर दबाव टाकण्याचे काम करत आहेत.