डोनाल्ड ट्रम्प यांचे खळबळजक विधान, परत दिली धमकी, थेट म्हणाले, भारतासाठी विनाशकारी…

डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारताला धमक्या देताना दिसत आहेत. आता पुतिन यांच्यासोबतच्या भेटीनंतर त्यांनी परत एकदा भारताला मोठी धमकी दिली आहे. त्यांनी थेट भारताबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. आता यावर भारताकडून काय उत्तरे दिले जाते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे खळबळजक विधान, परत दिली धमकी, थेट म्हणाले, भारतासाठी विनाशकारी...
| Updated on: Aug 17, 2025 | 10:39 AM

अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्याने वाद सुरू आहे. 27 ऑगस्टला भारतावर 50 टक्के टॅरिफ सुरू होईल. या टॅरिफचा थेट परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. टॅरिफवरून भारत चिंतेत असतानाच आता परत एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठी धमकी दिली आहे. अतिरिक्त कर लादण्याची परत एकदा धमकी भारताला देण्यात आलीये. पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर परत वातावरण तापले. थेट भारताला या भेटीनंतर धमकी देण्यात आलीये. ट्रम्प म्हणाले, रशियाने आपला तेलाचा मोठा ग्राहक गमावला आहे. तो ग्राहक म्हणजे भारत.

रशियाच्या 40 टक्के तेलात भारताचा सहभाग होता. आम्ही जर भारतावर आणखी निर्बंध लादले तर ते भारतासाठी विनाशकारी ठरेल. मुळात म्हणजे भारताने रशिया आणि अमेरिकेच्या भेटीचे स्वागत केले. मात्र, असे असताना देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्या काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी एकप्रकारे भारताला आणखी निर्बंधांची थेट धमकीच दिली आहे.

यासोबचत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारताला टॅरिफपासून सुटका नाहीच. याचाच एक भाग म्हणजे द्विपक्षीय व्यापार चर्चा देखील लांबणीवर टाकण्यात आलीये. अमेरिकेची टीम दिल्लीत येणारी होती. त्यांची नियोजित बैठक होती. मात्र, आता तो दाैरा रद्द करण्यात आला आहे. मुळात म्हणजे भारतावर अमेरिकेने मोठा टॅरिफ लावला आहे. 27 ऑगस्टपासून 50 टक्के टॅरिफ हा सुरू केला जाईल.

रशिया आणि अमेरिकेमध्ये झालेल्या बैठकीत भारताबद्दलच्या टॅरिफवर मोठा निर्णय होऊ शकतो, असे सांगितले जात होते. मात्र, या बैठकीतून भारताला काहीही मिळाले नाहीये. उलट परत एकदा भारताला डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून थेट धमकी देण्यात आली आहे. भारदताकडून आता अमेरिकेला नेमके काय उत्तरे दिले जाते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. भारत देखील अमेरिकेच्या कंपन्यांवर कारवाई करण्याच्या तयारी आहे. भारताने अमेरिकेच्या कंपन्यांवर कारवाई केली तर त्याचा थेट परिणाम हा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.