
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नोबेल शांतता पुरस्काराबाबत मोहभंग झाल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत ते त्यांची टीम, व्हाईट हाऊस ट्रम्प हे नोबेल पुरस्काराचे खरे हक्कदार असल्याचा दावा करत होते. नोबेल पुरस्कार आणि भारताने आपल्या मर्जीने वागावे यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर छेडले. भारतासह अनेक देशांना त्यांच्या या हट्टवादी धोरणाचा फटका बसला. पण आता नोबेल पुरस्कारासाठीच्या त्यांच्या जोर बैठका थंडावल्याची चर्चा सुरू झाली आहे. भारताच्या एका भूमिकेने त्यांचे पानीपत झाल्याचे समोर येत आहे. पडद्याआड काय घडली आहे ती घडामोड?
बोले तो ट्रम्प यांचं हृदय परिवर्तन
डोनाल्ड ट्रम्प यांचं हृदय परिवर्तन झाल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत नोबेल शांतता पुरस्कारासाठी आपल्या नावाची शिफारस करण्यासाठी त्यांनी अनेक देशांवर दबाव टाकला. संपर्क साधला. चर्चा केली. व्यापारी करारात सवलती आणि अनेक काय भानगडी केल्या. पण आता व्हाईट हाऊसमध्ये नोबेलचे नाव सुद्धा घेतल्या जात नसल्याची गोटातील माहिती तिथल्या माध्यमांनी दिल्याने जगात चर्चा सुरू झाली आहे.
आता मला पुरस्काराबद्दल बोलायचेच नाही
CBS न्यूजसोबत ट्रम्प यांनी नुकतीच चर्चा केली. त्यावेळी, “मला याविषयी काहीही सांगायचे नाही. मी केवळ युद्ध थांबवू शकतो. मी जगाचे माझ्याकडे लक्ष वेधू इच्छित नाही. मी केवळ लोकांचे प्राण वाचवू इच्छितो’ असा दावा त्यांनी नोबेल पुरस्कारावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केला. त्यांच्या या बदलेल्या भूमिकेने आश्चर्य व्यक्त होत आहे. आपण जगातील अर्धा डझन युद्ध थांबवली. त्यामुळे आपल्याला आता शांततेचे नोबेल मिळायला हरकत नाही अशी भूमिका त्यांनी जगजाहीर केली होती. त्यांनी भारताकडे सुद्धा नावाची शिफारस करण्यासाठी दबावतंत्र वापरले होते. इस्त्रायल,पाकिस्तान,कम्बोडिया आणि इतर काही देशांनी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे.
10 ऑक्टोबर रोजी पुरस्काराची घोषणा
नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा नॉर्वेजिनय नोबेल समिती 10 ऑक्टोबर रोजी करेल. यापूर्वी चार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना हा पुरस्कार मिळालेला आहे. यामध्ये ट्रम्प यांचे राजकीय विरोधक माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचाही समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात ट्रम्प यांनी नोबेल विषयी अगोदरच भाकीत केले होते. मी या पुरस्काराचा खरा हक्कदार आहे. पण ते नोबेल देणार नाही, असे ट्रम्प म्हणाले होते.
भारताची भूमिकेने नाराज
इस्त्रायल, पाकिस्तान, कम्बोडियासह अनेक राष्ट्रांनी ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची हाकाटी पिटली आहे. भारताने आपल्या नावाची शिफारस करावी अशी ट्रम्प यांनी मोठी इच्छा होती. पण भारताने त्यांच्या नावाची शिफारस केली नाही. पाकिस्तानसोबतच्या युद्ध थांबवण्याचे क्रेडिटही त्यांना दिले नाही. या घडामोडींमुळे ट्रम्प नाराज झाले. त्यांनी टॅरिफ वॉर लादले. पण त्यांच्या प्रयत्नांना भारत जुमानला नाही. त्यामुळे त्यांच्या जोर बैठका कमी झाल्याचा दावा तिथल्या सोशल मीडियात करण्यात येत आहे.