मोठा दिलासा! डोनाल्ड ट्रम्प यांचा युटर्न, टॅरिफबद्दल घेतला वेगळा निर्णय, सोन्याचे भाव उतरले

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळे अनेक देश चिंतेत आहेत. अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात टॅरिफ आकारला जातोय. त्यामध्येच आता याचाच धसका लोकांनी घेतलाय. अमेरिकेत सुद्धा टॅरिफविरोधात वातावरण सध्या बघायला मिळतंय. त्यामध्ये टॅरिफबद्दल ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतलाय.

मोठा दिलासा! डोनाल्ड ट्रम्प यांचा युटर्न, टॅरिफबद्दल घेतला वेगळा निर्णय, सोन्याचे भाव उतरले
Donald Trump
| Updated on: Aug 12, 2025 | 11:21 AM

अमेरिकेने भारतावर टॅरिफ लादल्यानंतर खळबळ उडाली. हेच नाही तर पुढील काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठे बदल होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. भारताने या समस्येवर पर्याय शोधण्यास देखील सुरूवात केलीये. मात्र, भारतावर इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ आकारल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली जातंय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेतील मागील काही वर्षांपासूनचे चांगले संबंध बिघडण्याच्या स्थितीत आहेत. भारताने अमेरिकेच्या अटी मान्य करू नये, असे काहींनी थेट म्हटले. अमेरिकेतूनही टॅरिफला विरोध केला जातोय.

आता सततच्या विरोधानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पाऊस मागे घेतल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, सोन्यावर कोणत्याही प्रकारची टॅरिफ लागणार नाहीये. मागील काही दिवसांपासून सतत चर्चा होती की, डोनाल्ड ट्रम्प हे सोन्यावर देखील मोठ्या संख्येने टॅरिफ आकारणार आहेत, ज्याने खळबळ उडाली. शेवटी आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, सोन्यावर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ लागणार नाही.

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमती सतत वाढताना दिसल्या. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोन्यावर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ लागणार नसल्याचे स्पष्ट करताच सोन्याच्या किंमत मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. सततच्या वाढणाऱ्या सोन्याच्या किंमतींना ब्रेक बसला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किंमतीत अचानक 1400 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोन्यावर कोणत्याही प्रकारचे टॅरिफ लागणार नसल्याचे स्पष्ट केल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास घेतलाय.

देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीतील बदल पाहिला तर इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या  IBJA.Com वेबसाइटवर सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,00,201 रुपये होता. पण बाजारातील व्यवहार बंद होताना तो 1 लाख रुपयांपेक्षा कमी होऊन 99,975 रुपयांवर बंद झाला. म्हणजेच थोडक्यात काय तर सोन्याचा दर 244 रुपयांनी घसरला. पुढील काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे सोन्यावरील भाव कमी अधिक होतच राहणार आहेत.