AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 टक्के भारतावर टॅरिफ लावणे आत्मघाती, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत, अमेरिकेतूनच..

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून भारताविरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर मोठा टॅरिफ लावला. त्यांनी लावलेल्या या टॅरिफने मोठी खळबळ उडाली. आता पुन्हा भारतावर टॅरिफचे संकट आहे.

100 टक्के भारतावर टॅरिफ लावणे आत्मघाती, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत, अमेरिकेतूनच..
Donald Trump
| Updated on: Aug 08, 2026 | 3:36 PM
Share

रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका आहे. अमेरिकेकडून धक्कादायक पाऊले उचलली जात आहेत. भारतासह अन्य काही देशांवर टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. 100 टक्के टॅरिफ अमेरिकेकडून लावला जाणार आहे. भारतावर अगोदर 200 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला होता. त्यानंतर तो टॅरिफ रद्द करण्यात आला. आता अमेरिकेच्या सिनेटने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर एक समान 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला विरोध होणार हे स्पष्ट आहे. अमेरिकेच्या खासदारांनी या निर्णयाचा विरोधही केला. भारतावर 100 टक्के टॅरिफ लावणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले.

हे एक आत्मघाती पाऊल असल्याचे म्हटले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातूनच भारतावरील टॅरिफकरिता विरोध केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा विरोध वाढताना दिसतोय. सिनेटरकडून यावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलीत. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिका निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. त्यात 100 टक्के टॅरिफमधून कोणतीही सुटका मिळणार नाही.

हा विधेयक आणताना हा तर्क लावण्यात आला की, या तेल खरेदीमुळे युक्रेन विरोधातील युद्धाला खतपाणी मिळतंय. भारत, चीन, अजरबॅजान, हंगरी, स्लोवाकिया हे देश रशियाकडून तेल खरेदी करणारे मुख्य खरेदीदार आहेत. मतदानानंतर सीनेटर ब्लूमॅंथल यांनी मीडियासोबत बोलताना म्हटले की, हे कठोर निर्बंध आणि आयात शुल्क या जीवघेण्या, गुन्हेगारी स्वरूपाच्या आणि आक्रमक युद्धात सहभागी असलेल्या सर्वांनाच रोखतील.

काही डेमोक्रॅट्सनी इशारा दिला की, या विधेयकामुळे ट्रम्प यांना आयात शुल्काबाबत नवीन अधिकार मिळतील. हे विधेयक मंजुरीसाठी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजकडे जाणार आहे. मात्र, तिथे जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. जर भारतावर 100 टक्के टॅरिफ लावला तर भारतालाही हा मोठा झटका असेल. भारतातून अनेक गोष्टी विदेशात निर्यात केल्या जातात. त्या गोष्टींवर मोठा टॅरिफ लागला तर मोठे नुकसान व्यापाऱ्यांचे होऊ शकते.

Follow Us
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?
आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; रोहित पवारांचा एल्गार
Rohit Pawar : आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांचा एल्गार
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...