मोठी बातमी! इराणचा घात झाला, सरकारविरोधात थेट मोठं बंड, लवकरच सत्तापाटल? ट्रम्प यांचं स्वप्न पूर्ण?
मोठी बातमी समोर येत आहे, एकीकडे इराणचं अमेरिका आणि इस्त्रायलसोबत युद्ध सुरू आहे. मात्र दुसरीकडे आता इराणवर आणखी एकम मोठं सकंट निर्माण झालं असून, मोठ्या बंडाची शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून इराण सातत्याने अमेरिका आणि इस्त्रायल या दोन बलाढ्य देशांसोबत लढत आहे. या युद्धात इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. बंदरं उद्ध्वस्त झाले आहेत, अमेरिकेकडून इराणमधील पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात येत आहे. एकीकडे इराण अमेरिका आणि इस्त्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धाला तोंड देत असतानाच दुसरीकडे आता इराणवर आणखी एक मोठं संकट आलं आहे. ते म्हणजे इराणमध्ये आता लवकरच मोठं बंड होण्याची शक्यता आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा अली खामेनेई यांचे जवळचे नातेवाईक आणि इराणमधील प्रभावशाली धर्मगुरू मोहम्मद बाकर खर्राजी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ज्यामध्ये सध्या इराणमध्ये असलेली ‘इस्लामी गणराज्य’ची सत्ता बदलून ‘इस्लामी सरकार’ स्थापन करा असं आवाहन करताना ते दिसत आहेत.
एवढेच नाही तर त्यांनी या व्हिडीओमध्ये ‘इस्लामी सरकार’ स्थापन करण्याचा संपूर्ण प्लान देखील सांगितला आहे. इस्लामीक गणराज्याला संमातर संघटना तयार करून कशा पद्धतीने इराणमध्ये असलेल्या सध्याच्या सरकारवर दबाव टाकला जाऊ शकतो, याचा रोडमॅप देखील त्यांनी आपल्या या व्हिडीओमध्ये सांगितला आहे. पाच मिनिटांच्या आपल्या या व्हिडीओमध्ये त्यांनी सध्या इराणमध्ये असलेलं सरकार उलथून टाकल्यानंतर नवी व्यवस्था कशी असेल? याची देखील माहिती दिली आहे. इराणमध्ये सध्या असलेलं सरकार हे आपल्या मूळ उद्देशापासून भरकटल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान त्यांनी आपल्या समर्थकांना असं आवाहन देखील केलं आहे की, प्रत्येक व्यक्तीने 17 लोकं जोडायचे आहेत. इराणमधील प्रमुख शहरातून आपल्या संघटनेत जवळपास अडीच लाख लोकांची भरती करण्याचं आपलं लक्ष्य आहे. त्यामुळे आता लवकर इराणमध्ये मोठा उठाव होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान जर तसं झालंच तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं देखील स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण इराणसोबत युद्ध सुरू होण्यापूर्वीच त्यांनी तेथील नागरिकांना इराण सरकारविरोधात बंड करण्याचं तसेच ते सरकार उलथून टाकण्याचं आवाहन केलं होतं.
