Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात, गव्हर्नरचा गंभीर आरोप, प्रकरण कोर्टात

ट्रम्प यांनी ओरेगॉनमध्ये 300 कॅलिफोर्निया नॅशनल गार्ड सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी या आदेशाला विरोध केला आहे. तसेच आपण या प्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचे न्यूसम यांनी म्हटलं आहे.

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात, गव्हर्नरचा गंभीर आरोप, प्रकरण कोर्टात
Trump is in Trouble
| Updated on: Oct 06, 2025 | 3:13 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे. ट्रम्प यांनी ओरेगॉनमध्ये 300 कॅलिफोर्निया नॅशनल गार्ड सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी या आदेशाला विरोध केला आहे. तसेच आपण या प्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचे न्यूसम यांनी म्हटलं आहे. याआधी एका न्यायालयाने ट्रम्प यांच्या पोर्टलँडमध्ये 200 नॅशनल गार्ड सैनिक तैनात करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली होती. यामुळे आता गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनीही कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

न्यूसम न्यायालयात अपील करणार

कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी ट्रम्प यांच्या आदेशाला विरोध करत हा निर्णय कायदा आणि अधिकाराचा धक्कादायक गैरवापर असल्याचे म्हटले आहे. न्यूसम म्हणाले की,’ट्रम्प करकार निर्लज्जपणे कायद्याची पायमल्ली करत असून धोकादायक निर्णय घेत आहे. ओरेगॉन नॅशनल गार्डवर नियंत्रण घेण्याच्या ट्रम्पच्या प्रयत्नांना फेडरल कोर्टाने रोखले होते. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प आता 300 कॅलिफोर्निया नॅशनल गार्ड सैनिक ओरेगॉनला पाठवत आहेत. आम्ही ही लढाई लढण्यासाठी न्यायालयात जात आहोत. ट्रम्प यांच्या हुकूमशाही वर्तनासमोर जनता गप्प राहू शकत नाही.’

व्हाईट हाऊस काय म्हटले?

व्हाईट हाऊसने याबाबत एक निवेदन जारी केले असून कॅलिफोर्निया नॅशनल गार्डचे सैन्य ओरेगॉनला पाठवले असल्याची माहिती दिली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या अबीगेल जॅक्सन म्हणाल्या की, “पोर्टलँडमधील हिंसक दंगली झाल्या, त्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सरकारी मालमत्तेचे आणि कर्मचाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या कायदेशीर अधिकाराचा वापर केला आहे.’

ओरेगॉनच्या राज्यपालांकडूनही विरोध

ओरेगॉनच्या गव्हर्नर टीना कोटेक यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. त्यांनी कॅलिफोर्निया नॅशनल गार्डचे सैन्य ओरेगॉनमध्ये पोहोचल्याची माहिती देत म्हटले की, ‘कॅलिफोर्निया नॅशनल गार्डचे 101 सदस्य काल रात्री ओरेगॉनमध्ये पोहोचले आहे. उर्वरित सैन्य आज पोहोचणार आहे. मात्र ओरेगॉनमध्ये लष्करी हस्तक्षेपाची गरज नाही. येथे राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही धोका नाही. ओरेगॉन हे आमचे घर आहे, येथील नागरिकांनी ट्रम्प प्रशासनाच्या बेकायदेशीर कृतींविरुद्ध शांततेत आवाज उठवावा’ असे आवाहनही कोटेक यांनी केले आहे.