
डोनाल्ड ट्रम्प हे कधी काय करतील याचा अजिबातच नेम नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान नेता आहेत आणि माझे चांगले जवळचे मित्र आहेत असे सांगून भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ डोनाल्ड ट्रम्प यांनी लावला. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या जवळपास सर्वच वस्तूंवर हा टॅरिफ लावला आहे. यामुळे अनेक व्यवसायांना मोठा फटका बसलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त भारतातून येणाऱ्या औषधांवर अजून 50 टक्के टॅरिफ लावला नाही. यामुळे अनेक कंपन्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. मात्र, गोळ्या आणि औषधांवर सध्याच टॅरिफ न लावण्याचे कारण आता पुढे आलंय.
गोळ्या आणि औषधांवर डोनाल्ड ट्रम्प यांना तब्बल 200 टक्के टॅरिफ लावायचा हे. गोळ्या आणि औषधांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्यामागे त्यांची मोठी योजना आहे. रिपोर्टनुसार, जगातील जेनेरिक औषधांचा प्रमुख निर्यातदार असलेला भारत विशेषतः या परिस्थितीमध्ये असुरक्षित आहे. जर अमेरिकेने 200 टक्के टॅरिफ औषधांवर लावला तर भारतीय औषध उत्पादकांना थेट मोठा तोटा होऊ शकतो आणि याचा परिणाम निर्यातीवर होईल.
काही अहवालात असे सांगण्यात आले की, ट्रम्प प्रशासन चीनमधून आयात केलेली औषधे आणि त्यांच्या कच्च्या मालावर एपीआयवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. यामुळे याचा फटका थेट भारताला बसू शकतो. जर भारतीय औषधांवर 200 टक्के टॅरिफ लागू केले तर निर्यात कमी होणार. कारण मिळणारा नफा हा फारच कमी असणार आहे. 200 टक्के टॅरिफ भारतीय औषधांवर लावले म्हणजे हा मोठा अन्याय असणार आहे. भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद करावे, याकरिता भारतावर दबाव टाकण्याचे काम हे सध्या सुरू आहे.
भारताला सतत अमेरिकेडून धमकावले जात आहे. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेला मोठी पोटदुखी उठली आहे. टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. त्यामध्येच पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी तपान दाैऱ्यानंतर लगेचच चीन दाैरा केला, यावेळी ते पुतिन यांच्यासोबत एकाच गाडीमध्ये बसून बैठकीला रवाने झाले.