AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतावर टॅरिफ लावण्याचे खरे कारण अखेर पुढे, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी पोलखोल, स्वत: च्या कुटुंबासाठी…

मागील अनेक वर्षांपासून भारत आणि अमेरिकेमधील संबंध चांगले राहिले आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर हे संबंंध ताणले गेले आहेत. याच संधीचा फायदा घेत चीनने भारतासोबत जवळीकता वाढवली आहे. मात्र, आता भारतावर टॅरिफ लावण्याचे खरे कारण हे पुढे आल्याचे बघायला मिळतंय.

भारतावर टॅरिफ लावण्याचे खरे कारण अखेर पुढे, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी पोलखोल, स्वत: च्या कुटुंबासाठी...
Donald Trump
| Updated on: Sep 02, 2025 | 9:38 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल वादग्रस्त विधान करत आहेत. त्यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावून मोठा धक्का दिला. हेच नाही तर भारतावरील दबाव वाढण्यासाठी थेट अमेरिकेच्या भूमीतून पाकिस्तानने परमाणू हल्ला करण्याची धमकी भारताला दिली. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत पंगा घेण्याचे खरे कारण पुढे आलंय. टॅरिफ हे फक्त कारण आहे. स्वत: च्या फायद्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत पंगा घेऊन अनेक वर्षांचे भारत आणि अमेरिकेमधील संबंध खराब केली आहेत.

आता यावर अमेरिकेतूनही स्पष्टपणे बोलले जात आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये आपल्या कुटुंबाच्या व्यापाराला पुढे घेऊन जाण्यासाठी भारतासोबतचे संबंध खराब केले आहेत. सुलिवन यांनी एक मुलाखत दिली. त्यांनी म्हटले की, अनेक वर्षांपासून अमेरिकेने सर्वात मोठा लोकतंत्र देश भारत यांच्यासोबत संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न केली.

पुढे त्यांनी म्हटले की, ट्रम्प कुटुंबासोबत व्यावसायिक करार करण्याची पाकिस्तानची इच्छा असल्याने ट्रम्प यांनी आता भारताशी संबंध दूर ठेवण्याच निर्णय घेतला आहे. भारत अमेरिकेची मजबूत भागीदारीमुळे ट्रम्प यांना अडथळा निर्माण होत असल्याने त्यांनी टॅरिफवरून भारतासोबत संबंध खराब केले आहेत. कारण डोनाल्ड ट्रम्प यांना माहिती होते की, भारत हा काहीही झाले तरीही त्यांनी टॅरिफच्या मुद्द्यावरून भारतासमोर ठेवलेल्या अटी या मान्य करणार नाही.

आपल्या हितासाठी फक्त आणि फक्त डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत पंगा घेऊन दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतावर पहलगाम हल्ला होण्याच्या अगोदरच ट्रम्प यांच्या कुटुंबाकडून वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियलने पाकिस्तान क्रिप्टो कौन्सिलसोबत करार केला. अनेक तज्ञांनी ट्रम्प कुटुंबाचा पाकिस्तानी व्यवसायातील सहभाग असल्याने ते भारतासोबत अशाप्रकारे वागत असल्याचा दावा केलाय. ट्रम्प हे टॅरिफच्या माध्यमातून भारतासोबत मोठा गेम करत असल्याचा आता स्पष्ट झालंय. मात्र, यावरून आता त्यांच्यावर अमेरिकेतूनही जोरदार टीका होताना दिसत आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा