झोपेच्या तंद्रीत ‘स्लीपी डॉन’…ओव्हलमध्ये भर पीसीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या डुलक्या, VIDEO व्हायरल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना त्यांच्या प्रकृतीवरुन अनेकदा लक्ष्य केले होते. आता डोनाल्ड ट्रम्प यांचा भर पत्रकार परिषदेत डुलक्या घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

एके काळी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा ‘स्लीपी जो’ असा उद्धार करणाऱ्या विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यात व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफीसात पीसी दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलीच डुलकी लागल्याचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर ‘स्लीपी डॉन’ अशा मिम्सचा पुर आला आहे. ज्यामुळे व्हाईट हाऊसला आता डॅमेज कंट्रोल करावे लागत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आगे. ज्यात ते डुलक्या घेताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हाईट हाऊसच्या त्यांच्या ओव्हल ऑफीसचा आहे. वास्तविक, ओव्हल ऑफीसमध्ये पत्रकार परिषद सुरु होती आणि ट्रम्प डुलकी घेत होते.
मीडियाच्या बातम्यानुसार ही घटना त्यावेळी झाली जेव्हा ओव्हल ऑफिसमध्ये वजन कमी करण्याच्या औषधांच्या किंमतीत कपाती संदर्भात प्रेस कॉन्फरन्स सुरु होती. कॅमेरा चालू होता परंतू ट्रम्प पेंगताना दिसत होते.
व्हिडीओने इंटरनेटवर हंगामा
ट्रम्प यांच्या डुलकी घेतानाच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर हंगामा झाला आहे. व्हिडीओवर यावरुन विविध मिम्स तयार केले जात आहेत. ‘स्लीपी डॉन’चा नॅरेटिव्ह सुरु झाला. कॅलिफॉर्नियाचे गव्हर्नर गेविन यांनी ट्रम्प यांचा फोटो पोस्ट करत लिहीले की डोजी डॉन इज बॅक. परंतू या व्हिडीओत मात्र त्यांचे डोळे कधी बंद होतात तर कधी उघडे होत आहेत. ते नीट डोळे उघडू शकत नव्हते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर व्हाईट हाऊस आता डॅमेज कंट्रोलच्या मागे लागले आहेत. व्हाईट हाऊसने या संदर्भात निष्कारण चुकीचे नॅरेटिव्ह पसरवले जात असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या प्रकृतीवर प्रश्नचिन्ह
यानंतर सोशल मीडियावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीत ट्रोल करणारे मिम्स येऊ लागले आहेत. लोक त्यांना ‘स्लीपी डॉन’ म्हणून टॉण्ट मारत होते. कधी काळी जो बायडेन यांच्यावर शेरे मारणारे आता ट्रम्प स्वत:च ट्रोल होऊ लागले आहेत. ट्रम्प यांनी एकेकाळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना ‘स्लीपी जो’म्हणत शेरेबाजी केली होती. मात्र या घटनेनंतर ट्रम्प यांच्या आरोग्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
