AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : आता जगात नवं युद्ध? ट्रम्प यांच्या आदेशाने खळबळ, समुद्रात थेट…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा आदेश दिला आहे. त्यांनी तब्बल 10 लाख टन वजन असणारी एक युद्धनौका सागरात तैनात करण्याचे फर्मान सोडले आहे. त्यामुळे आता नवे युद्ध भडकणार का? असे विचारले जात आहे.

Donald Trump : आता जगात नवं युद्ध? ट्रम्प यांच्या आदेशाने खळबळ, समुद्रात थेट...
donald trump and america and venezuela
| Updated on: Oct 25, 2025 | 7:05 PM
Share

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही. त्य़ांनी काही दिवसांपूर्वी एक हजार उडवून देण्याचा आदेश दिला होता. त्यांच्या या आदेशानंतर अमेरिका आणि व्हेनेझुएला या दोन देशांत तणाव वाढला आहे. विशेष म्हणजे हा तणाव निवळण्याऐवजी रोजच वाढत जात आहे. आता डोनाल्ड ट्रम्प लवकरच व्हेनेझुएला या देशावर मोठी कारवाई करू शकतात, असा दावा केला जात आहे. कारण ट्रम्प यांनी कॅरेबियन सागरात मोठी युद्धनौका तैनात करण्याचा आदेश दिला आहे.

ट्रम्प यांनी नेमका काय आदेश दिला आहे?

मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची विशाल आणि महाकाय अशी USS Gerald R. Ford ही युद्धनौका कॅरेबियन सागरात तैनात करण्याचा आदेश दिला आहे. ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही युद्धनौका तैनातही करण्यात आली आहे.

जहाजाचे वजन तब्बल एक लाख टन

हे जहाज एकाच वेळी 90 लढाऊ विमानांना वाहून नेऊ शकते. अमेरिकन सैन्याची ताकद दाखवून देण्यासाठीच ट्रम्प यांनी हा आदेश दिल्याचे म्हटले जात आहे. USS Gerald R. Ford ही युद्धनौका न्यूक्लियर पावर्ड एअरक्राफ्ट कॅरियर आहे. ती साधारण 1100 फूट लांब असल्याचे बोलले जात आहे. यासह अमेरिकन नौदलानुसार या युद्धनौकेचे वजन 1 लाख टन आहे. ही नौका एका तासाला साधारण 34.5 मैल अंतर कापू शकते.

व्हेनेझुएला देशाने काय आरोप केला?

अमेरिकेच्या या आदेशानंतर व्हेनेझुएला मात्र आता अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. अमेरिकेला आता युद्ध खेळायचे आहे. त्यामुळेच ही युद्धनौका तैनात करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी आता कधीच युद्ध करणार नाही, असे सांगितले होते. आता मात्र ते नवे युद्ध सुरू करत आहेत, असेही व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादूरो यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचा काय दावा?

दरम्यान, व्हेनेझुएला या देशाकडून अमेरिकाला युद्ध छेडायचे आहे, असा आरोप केला जात असला तरी अमेरिकेने मात्र आम्ही ही युद्धनौका मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी तैनात केली आहे, असा दावा केला आहे. आमच्या या निर्णयामुळे ड्रग्स तस्करी रोखली जाईल, असा दावा अमेरिकेने केला आहे. पण अनेक तज्ज्ञांच्या दाव्यानुसार व्हेनेझुएला या देशात सत्तापालट घडवून आणण्यासाठीच अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...