AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जग संपणार, काहीच वाचणार नाही…’, डोनाल्ड ट्रम्प यांची भविष्यवाणी, बाबा वेंगा यांचे म्हणणे खरे ठरणार का?

Donald Trump Prediction: अमेरिकेकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत. सध्या अमेरिकेकडे 5,177 अण्वस्त्रे असून त्यातील 1,477 नष्ट करण्यात येणार आहे. यापूर्वी 1960 च्या दशकात अमेरिकेकडे तब्बल 31,255 अण्वस्त्रे होती. रशियाजवळ 5,600 अण्वस्त्रे आहेत.

'जग संपणार, काहीच वाचणार नाही...', डोनाल्ड ट्रम्प यांची भविष्यवाणी, बाबा वेंगा यांचे म्हणणे खरे ठरणार का?
Donald Trump PredictionImage Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: Mar 14, 2025 | 1:43 PM
Share

Donald Trump Prediction: बाबा वेंगा यांनी जगाचा विनाश होणार असल्याचे भविष्य वर्तवले आहे. त्यांनी सन 2025 हे वर्ष जगासाठी घातक ठरणार असल्याचे म्हटले आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी भीती निर्माण करणारी आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अणूबॉम्ब मानवतेसाठी धोकादायक आहे. हे राक्षसी शस्त्रे वापरली गेली तर जगाचा अंत होईल. ते इतके विनाशकारी असेल की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर बाबा वेंगा आणि निकोलस औजुला यांचे भविष्य खरे ठरणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

फॉक्स न्यूजच्या ‘संडे मॉर्निंग फीचर्स’ला डोनाल्ड ट्रम्प यांनी मुलाखत दिली आहे. त्यात ते म्हणतात, आम्ही आण्विक शस्त्रांवर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करत आहोत. परंतु ते किती घातक आहे, त्याची कल्पना तुम्ही करु शकत नाही. त्या शस्त्रांवर तुम्ही इतका खर्च करत आहात, हे चुकीचे आहे. ज्या गोष्टी जगाचा अंत करणार आहेत, त्याच्यावर आम्ही पैसा खर्च करत आहोत. हवामान बदलामुळे जितका विध्वंस होणार नाही, तितका विध्वंश अण्वस्त्रांमुळे होईल.

उद्याही अण्वस्त्र हल्ला होणार

ट्रम्प यांनी इशारा देताना सांगितले की, अण्वस्त्र हल्ला ही कल्पना नाही. ते उद्याही होऊ शकते. बायडेन म्हणत होते, जगासाठी सर्वात धोकादायक हवामान बदल आहे. परंतु मी म्हणतो, वेगवेगळ्या देशांकडे असलेले अण्वस्त्रे जगासाठी सर्वात धोकादायक आहे. हे विशालकाय राक्षस आहेत. ते अनेक शहरे उद्धवस्थ करणार आहेत. त्यामुळे जगाने आता अण्वस्त्रांची संख्या कमी करायला हवी.

जग 100 वेळा नष्ट होणार

गेल्या महिन्यातच डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, अण्वस्त्रे कमी करण्याबाबत चीन आणि रशियाशी मला चर्चा करायची आहे. आमच्याकडे आधीच इतकी शस्त्रे आहेत, आम्हाला नवीन अण्वस्त्रे बनवण्याची गरज नाही. आपण जगाला 50 ते 100 वेळा नष्ट करू शकतो, इतके अणूबाँब आपल्याकडे आहे. त्यानंतरही अधिक अण्वस्त्रे बनवली जात आहेत. त्यावर आपण सर्वजण खूप पैसा खर्च करत आहोत, जे आपण इतर गोष्टींवर खर्च करू शकतो.

कोणाकडे किती अण्वस्त्रे

अमेरिकेकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत. सध्या अमेरिकेकडे 5,177 अण्वस्त्रे असून त्यातील 1,477 नष्ट करण्यात येणार आहे. यापूर्वी 1960 च्या दशकात अमेरिकेकडे तब्बल 31,255 अण्वस्त्रे होती. रशियाजवळ 5,600 अण्वस्त्रे आहेत. चीनजवळ 350 अण्वस्त्रे आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला चीनने आपल्या संरक्षण बजेटमध्ये वाढ केली होती. यानंतर चीन कुठेतरी अणुबॉम्ब बनवत असण्याची भीती व्यक्त होत आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.