ट्रम्प यांचा मोठा विरोधक भारतात येतोय, त्यांच्यासोबत करारांचा मास्टरस्ट्रोक नक्कीच US च्या जिव्हारी लागेल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विरोधक येत्या 26 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येतोय. त्या देशासोबत भारताचे अनेक महत्वाचे करार होतील. अलीकडे ट्रम्प अनेकदा भारतविरोधी भूमिका घेत असतात. या देशासोबत करार हे ट्रम्प यांच्या नक्कीच जिव्हारी लागतील.

ट्रम्प यांचा मोठा विरोधक भारतात येतोय, त्यांच्यासोबत करारांचा मास्टरस्ट्रोक नक्कीच US च्या जिव्हारी लागेल
Donald Trump
| Updated on: Feb 24, 2026 | 1:04 PM

टॅरिफ आणि व्यापाराच्या मुद्यावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांसोबत पंगा घेतला आहे. चीन, ब्राझील यांच्यासह कॅनडा बरोबरचे अमेरिकेचे संबंधही बिघडले आहेत. ट्रम्प यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना अनेक व्यापारी इशारे दिले आहेत. हेच मार्क कार्नी 26 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी भारत-कॅनडामध्ये अनेक महत्वाचे व्यापारी करार होतील. हे एकप्रकारे ट्रम्प यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं असेल. कारण सध्या कार्नी हे ट्रम्प यांच्या रडारवर आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी 26 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान भारत, ऑस्ट्रेलिया आणि जापान या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत.

त्यांच्या कार्यालयाने अधिकृत स्टेटमेंट जारी करुन याची माहिती दिलीय. व्यापार, ऊर्जा, टेक्नोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि संरक्षण या क्षेत्रात नव्या संधींचा शोध घेणं हा त्यांच्या दौऱ्यामागचा मुख्य उद्देश आहे. कार्नी आपल्या दौऱ्याची सुरुवात मुंबईपासून करणार आहेत. त्यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. कार्नी यांचा हा पहिला भारत दौरा आहे.

दोन्ही देशांमध्ये व्यापारिक करार होतील

दोन्ही नेते कॅनडा आणि भारताचे संबंध अधिक भक्कम करणं, पुढे नेणं यावर चर्चा करतील. खासकरुन व्यापार, ऊर्जा, टेक्नोलॉजी, AI, प्रतिभा, संस्कृती आणि संरक्षण क्षेत्रात नव्या भागीदाऱ्या बनवण्यावर भर असेल. कार्नी भारतात बिझनेस लीडर्सची सुद्धा भेट घेतील, जेणेकरुन कॅनडात गुंतवणूक वाढवता येईल. दोन्ही देशांमध्ये व्यापारिक करार होतील.

पंतप्रधान कार्यालयाने काय म्हटलय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी जून 2025 मध्ये मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरुन G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला गेले होते. “जगात वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर कॅनडा आपल्या अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत बनवण्यासह आत्मनिर्भर बनवण्यावर जोर देत आहे. सरकार देशात मजबूती आणणं, परदेशात व्यापार वाढवणं आणि मोठ्या परदेशी गुंतवणूकीला आकर्षित करण्याच्या दिशेने काम करत आहे” असं कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे.

2030 पर्यंत किती अब्ज डॉलरपर्यंत व्यापार नेण्याचा उद्देश?

2024 मध्ये कॅनडा भारताचा सातवा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. दोन्ही देशांमध्ये वस्तू आणि सेवांचा दुर्तफा व्यापार 30.8 ते 31 अब्ज डॉलरचा होता. 2025 मध्ये G20 समिटच्यावेळी दोन्ही देशांनी व्यापक आर्थिक भागीदारी करारावर औपचारिक चर्चा सुरु करण्यास सहमती दिली होती. 2030 पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार 70 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा उद्देश आहे.

Follow Us