AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा धमाका! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताबद्दल तो दावा, थेट पुतिन यांच्यासोबत दोन तास फोनवर चर्चा, खळबळ उडवणारा…

इस्त्रायल- हमास युद्धानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला मोर्चा हा आता रशिया-युक्रेन युद्धाकडे वळवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच पुतिन यांना फोन करत काही तास चर्चा केली. लवकरच दोन्ही देशातील अधिकाऱ्यांमध्ये महत्वाची बैठक होईल.

मोठा धमाका! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताबद्दल तो दावा, थेट पुतिन यांच्यासोबत दोन तास फोनवर चर्चा, खळबळ उडवणारा...
Donald Trump call to Vladimir Putin
| Updated on: Oct 17, 2025 | 6:28 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या तेल खरेदीबाबत मोठा दावा केला. भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नसलयाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगताच जगात खळबळ उडाली. मात्र, यावर भारताने आपली भूमिका स्पष्ट केली. हमास-इस्त्रायल युद्धानंतर डोनाल्ड ट्रम्प रशिया आणि युक्रेनच्या युद्धात लक्ष घालताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बराचवेळ चर्चा केली. काही दिवसांपूर्वीच दोन्ही नेत्यांची भेट देखील झाली होती. मात्र, मार्ग काही निघू शकला नाही. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांच्यासोबत संपर्क साधत थेट दोन तास चर्चा केल्याची माहिती आहे. रशियाने युक्रेनवरील हल्ले अधिक भीषण केली आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांच्यासोबत झालेला संवाद सोशल मीडियावर सांगितलाय. ट्रम्प यांनी म्हटले की, मी नुकतेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी टेलिफोनवरून संभाषण संपवला. खरोखरच हे बोलणे चांगले ठरले आणि फायद्याचेही. मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी माझे आणि अमेरिकेचे अभिनंदन केले. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, तुमचे युक्रेनसोबतचे युद्ध संपल्यानंतर आपल्यात व्यापार चर्चा होईल.

पुढच्या दोन आठवड्यात दोन्ही देशांच्या उच्च अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक होईल. ही बैठक रशिया आणि युक्रेन युद्ध संपवण्यासाठी होईल. युक्रेनचे अध्यक्ष  झेलेन्स्की यांच्यासोबतही अमेरिका बैठक करणार आहे. झेलेन्स्की यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेला मोठी मदत मागितली. अमेरिकेकडून प्रगत शस्त्रे मिळावी, याकरिता ते अमेरिकेकडून मदत मागत आहेत. मात्र, अमेरिकेने जर हे शस्त्रे युक्रेनला दिली तर रशियाचे मोठे नुकसान होऊ शकते.

युक्रेनने अमेरिकेकडे लांब पल्ल्याचे टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्र मागितले, ज्यानंतर एकच खळबळ उडाली. रशियाने युक्रेनवरील हल्ले तीव्र केली आहेत. अमेरिेकेने युक्रेनला टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्र देऊ नये, नाही तर अमेरिका रशियातील संबंध अधिक बिघडतील, असे स्पष्ट रशियाने म्हटले. जर अमेरिकेने हे शस्त्र युक्रेनला दिले तर आमचे अधिक नुकसान होईल. मात्र, रशिया आपल्या सुरक्षेसाठी तयार आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी