डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊस सोडून आलिशान वास्तूत राहायला जाणार

| Updated on: Jan 20, 2021 | 10:48 PM

डोनाल्ड ट्रम्प आता नेमकं कुठं राहायला जाणार? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत (Donald trump to make Mar a lago estate permanent home).

डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊस सोडून आलिशान वास्तूत राहायला जाणार
Follow us on

न्यूयॉर्क : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्यांना व्हाईट हाऊस हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं शासकीय निवासस्थान सोडावं लागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आता नेमकं कुठं राहायला जाणार? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत (Donald trump to make Mar a lago estate permanent home).

डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे पाम बीचच्या तटावर मार-ए-लागो इस्टेट नावाची एक भव्य वास्तू आहे. तिथेच ट्रम्प राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे ‘न्यूयॉर्क पोस्ट’मध्ये काही लोकांनी ट्रम्प यांच्या सामानाचे ट्रक त्यांच्या मार-ए-लागो या टुमदार घराच्या दिशेला गेल्याचे बघितल्याचं सांगण्यात आलं आहे.

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात मार-ए-लागो येथे बराच वेळ व्यथित केला आहे. त्यामुळे त्यांच्या या घराला ‘व्हिंटर व्हाईट हाऊस’ही म्हटलं जातं. त्यांच्या या वास्तूचं नाव आधी ट्रम्प टॉवर असं होतं. त्यांनी 2019 साली या घराच नाव मार-ए-लागो असं ठेवलं (Donald trump to make Mar a lago estate permanent home).

मार-ए-लागोत 128 खोल्या

डोनाल्ड ट्रम्प यांनी 1985 साली मार-ए-लागो हे घर एक कोटी डॉलर एवढ्या किंमतीत खरेदी केलं होतं. गेल्या चार वर्षांपूर्वी त्यांनी या वास्तूचं रुपांतर खासगी क्लबमध्ये केलं. त्यांचं हे अलिशान घर जवळपास 20 एकर जागेत पसरलेलं आहे. या घरात जवळपास 128 खोल्या आहेत. या वास्तू समोरच अटलांटिक महासागराचा सुंदर नजारा आहे. विशेष म्हणजे क्लबची मेम्बरशीप खरेदी करणाऱ्यांसाठी वास्तू परिसरातून या नजाराचा आस्वाद घेणं मोफत आहे.

हेही वाचा : ऐतिहासिक! जो बायडेन यांनी अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

संबंधित व्हिडीओ :