Russia Virus : डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, थेट पुतीन यांना कॉल…त्या महिलेच्या मृत्यूने जगात खळबळ!

सध्यातरी रशियात प्लेगचा आजार पसरल्याची पुष्टी करण्यात आलेली नाही. तरीदेखील तेथील सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.

Russia Virus : डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, थेट पुतीन यांना कॉल...त्या महिलेच्या मृत्यूने जगात खळबळ!
vladimir putin and donald trump
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2026 | 8:16 PM

सध्या रशियाच्या इरकुत्स्क येथी एका अँटी प्लेग रिसर्च इन्स्टीट्यूटमध्ये एका महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर आता प्लेगविषयी जगभरात चिंता वाढली आहे. 2 ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेल्या या महिला कर्मचाऱ्याचे नाव दर्या शिपिलोवा असे आहे. दर्या यांचा मृत्यू होताच त्यांच्या संपर्कातील साधारण 200 व्यक्तींना क्वारन्टाईन करण्यात आले होते. या महिलेचा मृत्यू प्लेगमुळेच झाला का याबाबत अद्याप स्पष्टपणे समजलेले नाही. परंतु ही घटना घडल्यानंतर सर्वत्र भीती व्यक्त केली जातेय. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील या प्रकरणात लक्ष घातलंय.

टेस्ट ट्यूब फुटल्याने त्या जीवाणूच्या संपर्कात?

दर्या शिपिलोवा जेथे काम करायच्या तेथे प्लेग तसेच इतर गंभीर आजारांवर संशोधन केलं जातं. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त केली जातेय. प्रयोगशाळेत काही घटकांच्या संपर्कात आल्याने ही घटना घडली असावी, असं सांगितलं जातंय. सोबतच टेस्ट ट्यूब फुटल्याने त्या जीवाणूच्या संपर्कात आल्या आणि त्यांचा मृत्यू झाला असादेखील दावा केला जातोय. या घटनेची चर्चा झाल्यानंतर रशियन आरोग्य विभागाने दर्या यांचा मृत्यू हा अज्ञात कारणामुळे झाला, असं सांगितलेलं आहे.

Loading...

प्लेगचे संक्रमण आढळलेले नाही

ही घटना समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनादेखील अलर्ट मोडवर गेली आहे. या संस्थेने रशियाकडून माहिती मागवली आहे. दर्या यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी करण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीमध्ये प्लेगचे संक्रमण आढळलेले नाही. काही लोकांमध्ये अन्य विषाणूचे संक्रमण असल्याचे समोर आलेय.

पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा करणार

दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. मी लवकरच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा करणार आहे. अमेरिका याबाबत गंभीर चर्चा करत आहे. लवकरच या प्रकरणाबाबत अन्य माहिती समोर येऊ शकते, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

दरम्यान, सध्यातरी रशियात प्लेगचा आजार पसरल्याची पुष्टी करण्यात आलेली नाही. तरीदेखील तेथील सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us