डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ, कुठे आणि केव्हा पाहायचं लाईव्ह प्रक्षेपण
अमेरिकेत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांचे युग सुरू होत आहे. डोनाल्ड ट्रम्प आज सोमवारी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. जगातील अनेक देशांच्या नेत्यांव्यतिरिक्त,विविध स्तरातील बडी मंडळी या सोहळ्याला हजर राहणार आहेत. या सोहळ्यातील भाषणाकडे जगाचे लक्ष लागले आहे.

अमेरिकेत पु्न्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प पर्व सुरु होत आहे. डोनाल्ड ट्रम्प आज सोमवारी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेत आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला जगातील अनेक देशाचे नेते आणि इतर क्षेत्रातील दिग्गज सामील होणार आहेत. या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शपथ सोहळ्याला चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या शिवाय अर्जेंटीनाचे राष्ट्राध्यक्ष माईली आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्या सह अनेक नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेले आहे.या शपथविधी सोहळा भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरु होत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली जाणार असून त्याचा शपथ सोहळा लाईव्ह देखील पाहाता येणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प आज ( २० जानेवारी रोजी ) अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. या समारंभाची भव्य तयारी करण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार हा शपथविधी सोहळा रात्री १०.३० वाजता होणार आहे. या सोहळ्याकडे यासाठी लक्ष लागले आहे की आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेताना डोनाल्ड ट्रम्प भाषण करताना कोणती मोठी घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येथे पहा लाईव्ह स्ट्रीमिंग –
ट्रम्प यांच्या शपथ सोहळ्याचा आनंद न्यूज चॅनलवर लाईव्ह पाहाता येणार आहे. या शिवाय टीव्ही 9 न्यूज वेबसाईटवर देखील पाहाता येणार आहे. या शपथ सोहळ्याच्या संदर्भात प्रत्येक अपडेट बातमी टीव्ही ९ भारतवर्ष न्यूज वेबसाईटवर पाहयला मिळणार आहे.




या आधी ट्रम्प यांनी रितिरिवाजानुसार शनिवारची रात्र ब्लेअर हाऊसमध्ये काढली आहे. जे व्हाईट हाऊस ( राष्ट्राध्यक्षांचे ऑफीस ) समोर पेन्सिल्वेनिया एव्हेन्यमध्ये राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आहे. डोनाल्ड ट्रम्प शहरापासून ३० मैल अंतरावर व्हर्जिनियाच्या स्टर्लिंगमध्ये गोल्फ क्लबमध्ये एका पार्टीत सहभागी झाल्यानंतर ट्रम्प ब्लेअर हाऊस येथे पोहचले आहेत.
अनेक देशांच्या नेत्यांना आमंत्रण –
ट्रम्प यांनी फ्लोरिडाच्या पाम बिच स्थित आपल्या मार-ए-लागो निवासस्थानाापासून वॉशिंग्टनसाठी स्पेशल सी – ३२ विमानाने प्रवास केला आहे. या विमानाला ‘स्पेशल एयर मिशन 47’ असे नाव देण्यात आले आहे. ज्यावेळी राष्ट्राध्यक्ष या विमानात बसतील तेव्हा या विमानाचे नाव ‘एअर फोर्स वन’ असे ठेवण्यात येणार आहे.
नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, अर्जेंटिनाचे अध्यक्ष झेवियर मायले आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह अनेक देशांच्या नेत्यांना आमंत्रण मिळाले आहे. शी जिनपिंग यांनी त्यांचे उपराष्ट्राध्यक्षांना त्यांचे प्रतिनिधी म्हणून वॉशिंग्टनला पाठवत आहेत.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची उपस्थिती
जर कोणत्याही देशाचा राष्ट्रप्रमुख या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या शपथ सोहळ्याला हजर राहीला तर अमेरिकन इतिहासातील हा पहिलाच प्रसंग असेल असे म्हटले जात आहे. आता पर्यंत कोणत्याही राष्ट्राध्यक्षांना या देशातील शपथविधी सोहळ्याला अधिकृत भेट दिलेली नाही. भारताच्या तर्फ विदेश मंत्री एस.सजयशंकर या समारंभाला भेट देणार आहेत.