ट्रम्प यांच्या शपथग्रहण सोहळ्याआधी अमेरिकेत निसर्गाचा कहर, घरातून बाहेर न पडण्याचे लोकांना आवाहन
आता काही तासांत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेण्यापूर्वीच स्पष्ट केले आहे की ते राष्ट्राध्यक्ष पदाच्या रुपात शपथ ग्रहण करण्यापूर्वी १०० महत्वपूर्ण फाईलींवर सह्या करणार आहेत. त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की ते अमेरिकेच्या बॉर्डरना मजबूत करणार आहेत. आपल्या पहिल्या टर्ममध्ये देखील ट्रम्प यांनी केले होते.

आता काही तासांत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. अमेरिकन वेळेनुसार दुपारी १२ वाजता डोनाल्ड ट्रम्प पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. प्रचंड थंडी असल्याने अमेरिकन ४० वर्षांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथग्रहण कॅपिटल हिलच्या रोटुंडा हॉलच्या आत होणार आहे. ट्रम्पच्या आधी १९८५ मध्ये रोनाल्ड रीगन यांचा देखील शपथग्रहण सोहळा इन्डोअर स्टेडियममध्ये झाला होता. वॉशिंग्टन डीसी मधील कडाक्याच्या थंडीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना रस्त्यावर उत्साह साजरा न करण्याचे आवाहन करीत घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.
काही वेळात सोहळ्याला सुरुवात होणार
ट्रम्प यांच्या शपथग्रहण समारंभाच्या आधीच्या औपचारिकता आता काही क्षणात सुरु होणार आहे. दिवसाची सुरुवात वॉशिंग्टन डीसीच्या व्हाईट हाऊसजवळील सेंट जॉन एपिस्कोपल चर्चमध्ये प्रार्थना सभेने होणार आहे. त्यानंतर नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि प्रथम महिला जिल बायडेन आणि व्हाईट हाऊसमध्ये चहा प्यायला जातील. येथे दोन्ही दाम्पत्यांना ट्रम्प यांच्या शपथग्रहणासाठी एकाच ताफ्यात अमेरिकन कॅपिटल बिल्डींगसाठी रवाना होतील. तेथे संगीताचे काही कार्यक्रम होतील, त्यानंतर आधी जेडी व्हान्स यांना उप राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतील. आणि त्यानंतर चिफ जस्टीस जॉन रॉबर्ट्स डोनाल्ड ट्रम्पना यांना शपथ देतील.
बायडेन आणि कमला हॅरिस यांना निरोप
शपथविधीनंतर डोनाल्ड ट्रम्प भाषण करणार आहेत. गेल्यावेळचे भाषण १७ मिनिटाचे होते. शपथग्रहणानंतर सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना सन्मानपूर्वक निरोप दिला जाणार आहे. राष्ट्रपती ट्र्म्प प्रमुख दस्ताऐवज, नामांकने आणि कार्यकारी आदेशावर सह्या करतील. त्यानंतर ट्रम्प आणि जेडी व्हान्स कॅपिटल वन एरिना येथे आयोजित परेडमध्ये सैनिकांची सलामी घेतील. त्यानंतर ट्रम्प आणि जेडी व्हान्स लंच करतील.त्यात शपथविधीसाठी आलेले विशेष अतिथी आणि प्रमुख पाहूणे सहभागी होतील.




अमेरिकेला पुन्हा महान बनवू : ट्रम्प
अमेरिकेत उत्तर ध्रुवाजवळ बर्फाचे वादळ सुरू आहे. त्याचा लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असे वाटते. म्हणूनच त्यांनी कॅपिटल रोटुंडा येथे उद्घाटन भाषण देण्याचे आदेश दिले आहेत. सर्वजण सुरक्षित असतील, सर्वजण आनंदी असतील आणि एकत्रितपणे आपण अमेरिकेला पुन्हा महान बनवू ,संसदेतील शपथविधी सोहळ्याची माहिती देताना ट्रम्प यांनी सांगितले आहे.
ट्रम्प यांना ग्रेटर अमेरिका घडवायचा आहे का?
कॅनडा, ग्रीनलँड, पनामा कालवा यासारख्या सर्व देशांनी अमेरिकेचा भाग व्हावा अशी डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच इच्छा व्यक्त केली होती. ट्रम्प यांना मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलून अमेरिकेचे आखात असे करायचे आहे. यामागील ट्रम्पचा हेतू ग्रेटर अमेरिका निर्माण करण्याचा आहे. ज्यामुळे अमेरिकेचे क्षेत्रफळ लक्षणीयरीत्या वाढेल. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ग्रीनलँड खरेदी करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.अमेरिकेसाठी रशियन आणि चिनी जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी ही बेटे खूप महत्त्वाची आहेत. ग्रीनलँड ताब्यात घेण्याची इच्छा प्रथम १८६० च्या दशकात अमेरिकेचे अध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन यांनी व्यक्त केली होती. परंतु अमेरिकेचे धोरण तेव्हा यशस्वी झाले नाही.