US-Venezuela Tension : तुमच्यासमोर नाही झुकणार, ट्रम्प यांच्या फायनल वॉर्निंगवर व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांच सडेतोड प्रत्युत्तर, कुठल्याही क्षणी युद्धाचा भडका

US-Venezuela Tension : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अंतिम इशारा दिला आहे. पण या छोट्याशा देशाने शक्तीशाली, बलवान अमेरिकेसमोर झुकण्यास नकार दिला आहे.उलट व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

US-Venezuela Tension : तुमच्यासमोर नाही झुकणार, ट्रम्प यांच्या फायनल वॉर्निंगवर व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांच सडेतोड प्रत्युत्तर, कुठल्याही क्षणी युद्धाचा भडका
Nicolas maduro-Donald trump
| Updated on: Dec 02, 2025 | 9:10 AM

अमेरिका आणि व्हेनेझुएलामध्ये तणाव वाढत चालला आहे. कुठल्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकेल अशी स्थिती आहे. अमेरिका मागच्या काही दिवसांपासून व्हेनेझुएलाच्या सीमेजवळ आपल्या सैन्य शक्तीचं प्रदर्शन करत आहे. अमेरिकेच लष्करी सामर्थ्य प्रचंड आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरुन खाली खेचण्याचं अमेरिकेच उद्दिष्ट्य आहे. पण निकोलस मादुरो अमेरिकेसमोर शरणागती पत्करायला तयार नाहीयत. त्यातून हा तणाव प्रचंड वाढला आहे. अमेरिकेच्या या वाढत्या दबावावर राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो बोलले आहेत. काराकास येथे आपल्या हजारो समर्थकांसमोर बोलताना त्यांनी गुलामगिरीतली शांती नको असं म्हटलं आहे. त्यामुळे मादुरो मागे हटणार नाहीत हे स्पष्ट आहे.

मागच्या काही दिवसांपासून नौदल तैनाती वाढवून अमेरिका व्हेनेझुएलाला टेस्ट करत आहे असं मादुरो आपल्या समर्थकांसमोर बोलताना म्हणाले. ‘शक्तीने राजकीय बदल घडवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही प्रतिकार करु’ असं निकोलस मादुरो यांनी म्हटलं आहे. हे स्पष्टपणे युद्धासाठी तयार असल्याचे संकेत आहेत. “आम्हाला शांतत हवी आहे. पण अखंडता,समानता आणि स्वातंत्र्यासह शांतता हवी आहे. आम्हाला गुलामगिरीची शांती नको” असं मादुरो म्हणाले.

मादुरो ऐकायला तयार नाहीत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या महिन्यात निकोलस मादुरो यांना फोन कॉल केला होता. हा फोन कॉल मादुरो यांच्यासाठी अंतिम इशारा मानला जात आहे. मादुरो यांनी तात्काळ पदावरुन पायउतार व्हावं, त्या बदल्यात त्यांना सुरक्षितपणे देशाबाहेर काढण्याचं आश्वासन ट्रम्प यांनी दिलं. पण मादुरो ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे अमेरिका-व्हेनेझुएलामध्ये युद्धाचा भडका उडू शकतो.

हे काहीतरी मोठं घडण्याचे संकेत

या फोन कॉल दरम्यान ट्रम्प यांनी मादुरोंवर तात्काळ पद सोडण्यासाठी दबाव टाकला. तात्काळ राजीनामा दिला, तर कुटुंबाच्या सुरक्षेची हमी दिली. सूत्रांच्या हवाल्याने मियामी हेराल्डने ही बातमी दिली. त्यानंतर मादुरो यांनी पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही देशांमध्ये कुठलाही संवाद झालेला नाही. व्हेनेझुएलाचा एअरस्पेस बंद करण्याचे ट्रम्प यांनी आदेश दिले आहेत.हे काहीतरी मोठं घडण्याचे संकेत आहेत.