मोठी बातमी! आणखी एका पाकिस्तानी हेराला पकडले; DRDOच्या गेस्टहाऊसमध्ये रहायचा, माहिती गोळा करायचा… पाकला कशी पाठवयचा माहिती?

जैसलमेर जिल्ह्यातील डीआरडीओ गेस्ट हाऊसचा मॅनेजर महेंद्र प्रसाद याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आले आहे. आरोपी 2008 पासून येथे कार्यरत आहे. या गेस्ट हाऊसमध्ये लष्करी चाचण्या आणि संशोधनाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि शास्त्रज्ञ मुक्काम करतात. तो हेरगिरी कसा करायचा जाणून घेऊया..

मोठी बातमी! आणखी एका पाकिस्तानी हेराला पकडले; DRDOच्या गेस्टहाऊसमध्ये रहायचा, माहिती गोळा करायचा... पाकला कशी पाठवयचा माहिती?
Pakistan
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 05, 2025 | 11:59 AM

पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील गुप्तचर यंत्रणा चांगलीच सक्रिय झाली आहे. त्यांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या संशयिताना ताब्यात घेण्याचा धडका लावला आहे. ज्योती मल्होत्रानंतर अनेक ठिकाणाहून पाकिस्तानी हेरांना अटक करण्यात आली. काही भारतीयांना हनी ट्रॅप प्रकरणात अडकवून हेरगिरी करण्यास भाग पाडले. तर काहीजण पाकिस्तान प्रेमी निघाले. आता भारत-पाकिस्तान सीमेवर आणखी एका संशयिताला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा संशयित डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या गेस्ट हाऊसचा मॅनेजर आहे.

डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या गेस्ट हाऊसमध्ये लष्करी चाचण्यांशी संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि शास्त्रज्ञ थांबतात. येथून मॅनेजर भारताचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानला गुप्त माहिती पाठवत होता. या प्रकरणाचा खुलासा झाल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणा आणि लष्करी गुप्तचर विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. माहितीनुसार, पकडलेल्या संशयित हेराचे नाव महेंद्र प्रसाद आहे.

वाचा: अख्खं गाव ढसाढसा रडत होतं, पण तो मित्राच्या अंत्ययात्रेत DJ लावून मनसोक्त नाचत होता… चिठ्ठीत नेमकं काय होतं?

काय आहे हेराचे नाव?

महेंद्र प्रसाद हा उत्तराखंडमधील अल्मोडा येथील रहिवासी आहे. तो भारत-पाकिस्तान सीमेवर जैसलमेर जिल्ह्यातील चांधन येथील डीआरडीओ गेस्ट हाऊसचा मॅनेजर आहे. त्याच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा गंभीर आरोप आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने लष्करी अधिकाऱ्यांची माहिती सीमेपलीकडे पाठवल्याचा आरोप आहे. जैसलमेरमध्ये पोखरण फायरिंग रेंजसारखी संवेदनशील ठिकाणे आहेत.

मोबाइल आणि चॅट्समधून हेरगिरीचे महत्त्वाचे पुरावे सापडले

असे सांगण्यात येत आहे की, आरोपीने यासंबंधी बरीच माहिती लीक केली आहे. त्याच्या मोबाइल आणि चॅट्समधून हेरगिरीचे महत्त्वाचे पुरावे मिळाले असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर संशय आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी बराच काळ त्याच्यावर नजर ठेवली होती. पुरावे मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले. सुरक्षा यंत्रणा आणि लष्करी गुप्तचर विभाग त्याची कसून चौकशी करत आहे. आज जेआईसी देखील त्याची चौकशी करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

आरोपी 2008 पासून डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये कार्यरत

आरोपी हेर 2008 पासून डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये कार्यरत आहे. तो कधीपासून हेरगिरी करत होता, याचा पूर्ण खुलासा अद्याप झालेला नाही. सुरक्षा यंत्रणांनी जैसलमेर जिल्ह्यात आतापर्यंत अनेक हेरांना अटक केली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर सुरक्षा यंत्रणा जैसलमेरमध्ये सतर्क झाल्या आहेत. या ऑपरेशननंतर तिथून दोन मोठे हेर पठाण खान आणि शकूर खान यांना अटक करण्यात आली होती.