AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel War : काल रात्री इराणने पेटाऱ्यातून बाहेर काढलं सर्वात खतरनाक मिसाइल, इस्रायलच्या खात्म्याची घोषणा

Iran Israel War : "अमेरिकेला या संघर्षाचा शेवट पहायचा आहे. त्यात इराणच पूर्ण आत्मसमर्पण असू शकतं. मी चर्चेच्या मूडमध्ये नाहीय" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इस्रायलने काल वरिष्ठ सैन्य अधिकारी जनरल अली शादमानी यांना संपवलं. त्याआधी वरिष्ठ जनरल ग़ुलाम अली राशिद यांचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

Iran Israel War : काल रात्री इराणने पेटाऱ्यातून बाहेर काढलं सर्वात खतरनाक मिसाइल, इस्रायलच्या खात्म्याची घोषणा
fateh hypersonic missile
| Updated on: Jun 18, 2025 | 9:23 AM
Share

इस्रायल विरुद्ध युद्धात इराणने बुधवारी आपल्या पेटाऱ्यातून सर्वात खतरनाक फतेह मिसाइल बाहेर काढलं. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस III मध्ये फतेह हायपरसोनिक मिसाइलचा वापर केल्याची घोषणा इस्लामिक रिवोल्यूशन गार्ड्स कॉर्प्सने (IRGC) केली. फतेह मिसाइलने इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टिमला यशस्वीपणे भेदल असं आयआरजीसीकडून सांगण्यात आलं. फतेह मिसाइलचा वापर हा ऑपरेशनमधला टर्निंग पॉइंट असल्याचा दावा IRGC ने केला आहे. फेतह मिसाइलच्या तैनातीने इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टिमच्या शेवटाची सुरुवात केली आहे असं आयआरजीसीच म्हणणं आहे. शक्तीशाली आणि अत्यंत वेगवान फतेह मिसाइल्सनी इस्रायलमधील ठिकाणांना हादरवून सोडलय असं IRGC च म्हणणं आहे.

या मिसाइलच्या वापरामुळे तेल अवीवच्या सहकाऱ्यांना इराणची ताकत किती आहे, त्याचा स्पष्ट संदेश गेलाय. IRGC चा रोख अमेरिकेकडे आहे. फतेह मिसाइलमुळे इस्रायलच्या आकाशावर इराणने नियंत्रण मिळवल्याचा IRGC ने दावा केलाय. इराणच्या अचूक हल्ल्यांसमोर इस्रायली जनता पूर्णपणे असहाय्य असल्याचा त्यांचा दावा आहे.

इराणच्या आधी फक्त तीन देशांकडे ही टेक्नोलॉजी

फतेहचा अर्थ विजय असा होतो. या मिसाइलची रेंज 1400 किमी आहे. जून 2023 मध्ये या मिसाइलचा इराणी सैन्यात समावेश करण्यात आला. IRGC चे माजी एअरोस्पेस कमांडर ब्रिगेडियर जनरल आमिर अली हाजीजादेह यांनी, 2023 साली या मिसाइलच्या समावेशावेळी ही एक मोठी झेप असल्याच म्हटलं होतं. इराणच्या आधी फक्त तीन देशांकडे हायपरसोनिक मिसाइल बनवण्याची टेक्नोलॉजी आहे.

किती घातक आहे हे मिसाइल?

यात रशिया, चीन आणि भारत हे तीन देश आहेत. त्यांचे मॉडल लॉन्च प्लॅटफॉर्म, रेंज, पेलोड आणि हायपरसोनिक टेक्नोलॉजी वेगवेगळी आहे. न्यू यॉर्क टाइम्सनुसार इराणने 1 ऑक्टोंबर 2024 रोजी इस्रायलवर हल्ला करताना हे मिसाइल वापरलं होतं. हे हायपरसॉनिक मिडियम रेंज बॅलेस्टिक मिसाइल आहे. याचं वजन 350 किलोग्राम ते 450 किलोग्राम दरम्यान आहे. हे 12 मीटर लांब मिसाइल 200 किलोग्रॅम स्फोटकं वाहून नेऊ शकतं.

‘विनाअट आत्मसमर्पण करा’

इस्रायल इराण युद्ध दिवसेंदिवस तीव्र रुप धारण करत चाललं आहे. इराणच्या बड्या लष्करी अधिकाऱ्यांना मारल्याचा दावा इस्रायलने केला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी नागरिकांना तेहरान रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. इराणने विनाअट आत्मसमर्पण करावं असं म्हटलं आहे.

नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले.
30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा... सरोज अहिरेंची प्रतिक्रिया
30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा... सरोज अहिरेंची प्रतिक्रिया.
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय.
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.