Pakistan Earthquake : पाकिस्तानात भल्या पहाटे भीषण भूकंप, आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

| Updated on: Oct 07, 2021 | 9:13 AM

Earthquake in southern Pakistan : पाकिस्तानच्या (Pakistan) हरनई भागात आज पहाटे भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सुमारे 150 लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Pakistan Earthquake : पाकिस्तानात भल्या पहाटे भीषण भूकंप, आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी
Pakistan Earthquake
Follow us on

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) हरनई भागात आज पहाटे भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सुमारे 150 लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. भूकंपाची तीव्रता 6.0 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे हादरे जवळपासच्या अनेक जिल्ह्यात जाणवले.

पहाटे 3.30 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. हरनई हा भाग पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये येतो. या भूकंपानंतर क्वेटा येथून मदत आणि बचावकार्यासाठी पथकं रवाना झाली. क्वेटामधून हरनई परिसरात पोहोचण्यासाठी दोन-तीन तासांचा अवधी लागतो. दरम्यान, जखमींवर हरनई इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रुग्णालयात मोबाईल टॉर्चने उपचार

पाकिस्तानी माध्यमांकडून येणाऱ्या व्हिडीओनुसार, हरनईतील रुग्णालयांमध्ये वीज नाही. त्यामुळे जखमींवर मोबाईल टॉर्चच्या प्रकाशाने उपचार केले जात आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, भूकंपाचा प्रभाव अनेक जिल्ह्यांमध्ये आहे, त्यामुळे जखमींची नेमकी संख्या सांगणे शक्य नाही.

पाकिस्तानमध्ये पहाटे तीनच्या सुमारास हा भूकंप झाला. त्यावेळी सर्वजण साखरझोपेतच होते. नेमकं काय घडलं हे कुणालाच कळलं नाही. ज्यांना भूकंपाचे हादरे जाणवले, ते नागरिक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळू लागले. काहींना जीव वाचवण्यात यश आलं तर काही जण जखमी झाले.

दरम्यान, भूकंपामुळे अनेक घरांचं मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय जखमी आणि मृतांची नेमकी संख्या माहिती नसल्याने हा आकडा वाढण्याची भीती आहे.

संबंधित बातम्या    

पाकिस्तानातून आलो, ISI ने 20 हजार दिले, उरीमध्ये नाल्यात लपलो, जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याचे खुलासे

Video: जेसीबीच्या फाळक्यात बसून नव दाम्पत्याची वरात, पाकिस्तानच्या जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल